नंदकिशोर मुंदडांचे उपोषण सुरूच; केजमध्ये रास्ता रोका
अंबाजोगाई,(प्रतिनिधी):- तालुक्यातील श्रीपतरायवाडी शिवारात बांधण्यात आलेले स्त्री रुग्णालय व वृध्दत्व निवारण, मनोरुग्णालयाच्या इमारतीवर करोडो रुपये खर्च होऊन सुध्दा अद्यापही हे रुग्णालय सुरु झालेले नाही, ते त्वरीत सुरु करावे या मागणीसह इतर मागण्यासाठी डॉ.विमलताई मुंदडा विचार मंचच्या वतीने जेष्ठ सामाजिक नेते नंदकिशोर मुंदडा व त्यांचे सहकारी यांचे उपजिल्हाधिकारी कार्यालया समोरील उपोषण तिसर्या दिवशीही सुरूच असून त्यांना पाठिंबा म्हणून आज सकाळी मुंदडा समर्थकांनी रस्त्यावर ठिय्या मांडून आंदोलन केले. यामुळे बराचवेळ वाहतुक ठप्प झाली होती.
सामान्य जनतेच्या प्रश्नार्थ नंदकिशोर मुंदडा यांनी सुरू केलेल्या उपोषणास सर्वस्तरातून पाठिंबा मिळत असून उपनगराध्यक्ष सारंग पुजारी, उपसभापती तानाजी देशमुख, सभापती मधुकर काचगुंडे, नगरसेवक शेख रहीमभाई, शम्मो काझी, बाला पाथरकर, खलील मौलाना, दिनेश भराडिया, संतोष शिनगारे, जावेद गवळी, महादु मस्के, सुभाष बाहेती, राजेश व्हावळे, वैजनाथ देशमुख, पंडित जोगदंड, महेश अंबाड, राहुल कापसे, मयुर रणखांब, अमोल पवार, अमोल साखरे, गौरव लामतुरे, दिपक सुरवसे, श्री डांगे, अक्षय लंगे, अनंत आरसुडे, जुनेद सिद्दीकी, विनोद गायकवाड, इर्शाद शेख, मुबारक शेख, योगेश कडभाने, सरपंच सुर्यकांत माने, सुरज पटाईत, अतुल इंगळे, ताहेरभाई, तसेच केजचे ज्ञानेश्वर चौरे, सुदाम पाटील, नांदे, अतुल इंगळे, शरद इंगळे आदी उपस्थित होते. मुंदडा यांच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून केज येथे आज सकाळी शिवाजी चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादीचे सुनिल घोळवे, महादेव सुर्यवंशी, राहुल गदळे आदी कार्यकर्त्यांनी केज च्या शिवाजी चौकात रास्ता रोको आंदोलन केले.
Add new comment