परिक्षेत पास झाले तरच सरपंचांना सहिचा अधिकार - पवार
अहमदनगर (प्रतिनिधि)
राज्यात थेट जनतेतुन सरपंच निवडीचा प्रयोग यशस्वी झाला असून आत्तापर्यंत ७ हजार ३०० सरपंच जनतेतुन निवडले आहेत. या सरपंचांना शासन प्रशिक्षक देणार असुन प्रशिक्षनानंतर परिक्षा घेतली जाणार आहे. या परिक्षेत पास झाले तरच जनतेतुन निवडून आलेल्या सरपंच यांना सहिचे अधिकार दिले जाणार आहेत.याबाबत लवकरच निर्णय होणार असल्याचे मत आदर्श गाव योजनेचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांनी व्यक्त केले.
नगर तालुका पत्रकार संघ व नगर तालुका बाजार समितीतर्फे आयोजित गाव कारभारी परिषदेत मार्गदर्शन करताना ते बोलत होते. दरम्यान ते म्हणाले, चौदाव्या वित्त आयोगाच्या निधीसह ५ हजार लोकसंख्येच्या गावांना प्रतिवर्षी ५० लाख रुपये निधी देण्याबाबत सरकार विचार करीत आहे. आमच्या समितीने ही शिफारस केली आहे. लवकरच यावर निर्णय अपेक्षित आहे.
Add new comment