बेमुदत उपोषणाचा दुसरा दिवस; पाठींबा म्हणून केजमध्ये उद्या रास्ता रोको
अंबाजोगाई(प्रतिनिधी) जनसामान्यांच्या प्रश्नासाठी नंदुशेठ मुंदडा पुन्हा एकदा रस्त्यावर उतरले आहेत. मागण्यांच्या पुर्ततेसंदर्भात त्यांनी उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. उपोषणाचा आज दुसरा दिवस असुन नंदुशेठ यांच्या आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी केज येथे उद्या सोमवार दि.२९ रोजी शिवाजी चौकात रस्ता रोको करण्याचा इशारा समर्थकांनी दिला आहे. दरम्यान लोकहिताच्या कामासाठी नंदुशेठ थेट उपोषणाला बसले असुन त्यांना सर्व स्तरातून पाठींबा मिळत आहे.
लोखंडी सावरगाव परिसरातील जेनेटीक आणि वंध्यत्व निवारण रूग्णालय सुरू करावे ही मुंदडा यांची प्रमुख मागणी आहे. याठिकाणी १०० खाटांचे स्त्री रूग्णालय करावे, आरटीओ कार्यालय बांधण्यात यावे आणि संपूर्ण परिसराला स्व.विमलताई मुंदडा यांचे नाव देण्यात यावे, अंबाजोगाई शहराबाहेर असलेले महाबीजचे कार्यालय शहरात आणावे, केज तालुक्यातील पाथ्रा, अंबाजोगाईतील वाघाळा येथील वीजउपकेंद्र सुरू करण्यात यावे आदिंसह विविध मागण्यांसाठी नंदुशेठ सह आदिंनी उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास सुरूवात केली आहे.
Add new comment