लाइव न्यूज़
आज पासून नवीन माणसांशी मला जोडलंय आणि मी एकदा जुडल्या नंतर जोडणारांना आयुष्यात कधीच विसरत नाही - पंकजाताई मुंडे
परळी- मेहबुबिया शिक्षण संस्था व परळी क्रीडा संघटना यांच्या संयुक्त विद्यमानाने संस्थेचे अध्यक्ष सय्यद करीम सय्यद यासीम यांना 100 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल क्रीडा महोत्सवा चे आयोजन करण्यात आले आहे.
या स्पर्धे निमित्य आज मला बोलाऊन संस्थेचे सचिव बहादूर भाई यांनी या विद्यार्थ्यांबरोबर माझे नवीन नाते जोडले आहे, अाणि मी जेव्हा एखादे नवीन नाते जोडते तेव्हा ते मी आयुष्यात कधीच विसरत नाही असे उदगार स्पर्धेच्या उदघाटक आपल्या जिल्ह्याच्या पालकमंत्री मा ना पंकजाताई मुंडे यांनी काढले
अतिशय दिमाखदार अश्या या सोहळ्याचे उदघाटन पालकमंत्री पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते आज सकाळी 8,30 वा तोतला मैदान या ठिकाणी झाले
नियोजन बद्द या सोहळ्याचे परळीत इमदादुल उलुम मा. विद्यालये, डॉ झाकेर हुसैन, मिलिया विद्या, बिलाल विद्या, वैद्यनाथ विद्या, सरस्वती विद्या, न्यू हायस्कुल थर्मल, भेल स्कूल , शारदाबाई मेनकुदळे विद्यालय, जगमित्र नागा विद्या, निवासी आश्रय शाळा , अभिनव विद्या, लिटल फ्लावर स्कूल, फाउंडेशन विद्या, अभिनव विद्या, मिलिंद विद्या, कृष्णबाई विद्या,पोदार विद्यालय,जि.प.शाळा परळी,अंजुम उल उलुम कन्या,सह एकूण 20 शाळेतील विद्यार्थी सहभागी झाले,
60000 हजार रु.ची रोख बक्षिसे स्म्रती चिन्ह, प्रमाणपत्र अशी शाळेच्या इतिहासात पाहिल्यादाच एवढ्या मोठ्या बक्षिसांची लयलूट होणार आहे,
क्रीडा ज्योत, सर्व शाळेचे फलक,झेंडे एकसारखी ड्रेसकोड , भव्य व्यासपीठ, सुंदर व स्वच्छ मैदान अश्या एकना एक छोट्या छोट्या गोष्टींची काळजी मेहबुबिया संस्थेच्या वतीने अतिशय काळजीने घेण्यात आली ,
अश्या या दिमाखदार उद्घाटन सोहळ्याच्या अध्यक्ष स्थानी संस्थेचे अध्यक्ष सय्यद करीम साहब हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून वैद्यनाथ देवल कमिटिचे सचिव राजेश देशमुख, बाजीराव धर्माधिकारी,जुगलसेठ लोहिया, दत्तप्पा ईटके गुरुजी,सचिन कागदे, साहेबराव फड,दीपक तांदळे,सय्यद खालेद राज,स.यासीन स हनिफ, अब्दुल करीम साहब,ताज खा इमाम खां, विकासराव दुबे, बाबू नंबरदार ई मान्यवर उपस्थित होते
दि 27 ते 1 फेब्रु दरम्यान चालणाऱ्या या स्पर्धेत खो-खो कबड्डी, क्रिकेट,लंगडी, टेनिकॉइट, रस्सीखेच, या सांघिक तर 100 मी 200 मी धावणे,थाळी फेक,गोळाफेक, लांबउडी अश्या विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
या सर्व स्पर्धा तोतला मैदानावर संपन्न होत असून याचा परळी करांनी लाभ घ्यावा असे आव्हान मेहबुबिया शिक्षण संस्थेचे सचिव तथा मुख्य आयोजक सय्यद हनिफ सय्यद करीम उर्फ बहादूर भाई तथा क्रीडा संयोजक श्री अनकाडे सर यांनी केले
या स्पर्धा यशवी करण्यासाठी इमदादुल उलूम प्राथमिक, माध्यमिक व अंजुम उलुम प्राथमिक, माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक व सर्व कर्मचारी तसेच श्री.अजय जोशी, संजय उर्फ पापा देशमुख,विजय मुंडे,श्री.मदन कराड सर,बालाजी हांगरगे ,संजय शेप, अरुण सोनवणे, नारायण वानखेडे , बंडू चव्हाण, श्रीधर जाधव, सुभाष नानेकर ,श्री केंद्रे ,ए.पी.मुंडे,अतुल दुबे,श्री.गुट्टे ,कांबळे, माळी सर, गजानन चव्हाण,ओम मेनकुदळे, मोदी सर,इतर कर्मचार्यारी परिश्रम घेत आहेत.
Add new comment