लाइव न्यूज़
माझी कन्या भाग्यश्री लघुचित्रपट देशाला मुलींची जनजागृती देणारा संदेश ठरेल- डॉ.शालिनीताई कराड
परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- दिग्दर्शक राहुल केंद्रे,सहदिग्दर्शक अनुज पालसिंगनकर व लेखक संतोष क्षिरसागर यांनी माझी कन्या भाग्यश्री हा लघुचित्रपट संपूर्ण देशाला स्त्रीभ्रूण हत्या विरोधी जनजागृती करणारा ठरेल असे प्रतिपादन महिला व बाल हक्क आयोगाच्या सदस्या डॉ.शालिनीताई कराड यांनी केले त्या या लघुचित्रपट पोस्टर लाँच करताना बोलत होत्या.
परळी येथील व्हीरंगणा फिल्मस प्रस्तुत माझी कन्या भाग्यश्री या लघुचित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे.या लघुचित्रपटाचे लेखन व दिग्दर्शक राहुल केंद्रे ,सहदिग्दर्शक अनुज पालसिंगनकर व लेखक संतोष क्षिरसागर यांनी केले आहे. या लघुचित्रपटाचे पोस्टर नुकतेच डॉ.शालिनीताई कराड यांच्या हस्ते लॉन्च करण्यात आले. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या की, मुलींनी वाचविण्याचे प्रयत्न सर्वांनी केले पाहिजे आणि यासाठी सरकार जागरूक आहे. समाजात स्त्रीभ्रूण हत्येची घटना घडू नये यासाठी देशात नवा संदेश देण्याचे काम या लघुचित्रपटाच्या माध्यमातून केले आहे.तसेच शासनाच्या माझी कन्या भाग्यश्री योजने बद्दल अधिक माहिती दिली आहे.
याकार्यक्रमास र्हदयरोग तज्ञ बालासाहेब कराड, सरपंच विष्णू चाटे, परळी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष महादेव गित्ते सह माझी कन्या भाग्यश्री या मराठी लघुचित्रपटाचे दिग्दर्शक राहुल केंद्रे, सह दिग्दर्शक अनुज पालसिंगनकर व परशुराम वनवे तर लेखक संतोष क्षिरसागर, संकलन समीर प्रसाद, मनोज अलदे, संगितकार देवशिष महाकाले यांनी विरांगना फिल्म्सने लघुचित्रपटाची निमिती केली आहे. हा लघुचित्रपट दि.01 फेब्रुवारी प्रर्दशित होणार आहे.
यावेळी या कार्यक्रमास कृष्णा नागरगोजे, गौतम साळवे, भावेश कांबळे, सुनिल पारधे, प्रेम सरवदे, राजकुमार मुळे व व्हीरंगणाचे कलावंत हे उपस्थिती होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशांत तोतला यांनी केले तर आभार दिग्दर्शक राहुल केंद्रे यांनी मानले.
Add new comment