सर्वेश नावंदेची प्रजासत्ताक कॅम्पसाठी निवड ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज पुरस्कार वितरण
परळी/प्रतिनिधी
नवी दिल्लीत होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात सर्वेश सुभाष नावंदे या विद्यार्थ्याची राष्ट्रीय छात्र सेना ग्रुपमध्ये महाराष्ट्राकडून प्रजासत्ताक दिन कॅम्पसाठी निवड झाली आहे. तो राज्याचा उत्कृष्ठ छात्रसैनिक म्हणून निवडला असून आज 28 जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते त्याला पुरस्कार दिला जाणार आहे.
सर्वेश सुभाष नावंदे हा महाराष्ट्र एनसीसीच्या ग्रुपकडून प्रजासत्ताक दिन कॅम्पसाठी निवडला गेला आहे. मागील 30 दिवसांपासून तो दिल्लीत प्रजासत्ताक दिन संचलनाचा सराव करीत होता. त्याची उत्कृष्ठ छात्रसैनिक म्हणून निवड झाली असून त्याला प्रेसिडेंट ऍवॉर्ड आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दिला जाणार आहे. आज 28 जानेवारी रोजी सकाळी 7 वा. या पुरस्कार वितरणाचे प्रक्षेपण दुरदर्शनच्या राष्ट्रीय वाहिनीवरून होणार आहे.
सर्वेश हा आदर्श शिक्षक अशोक नावंदे व औरंगाबाद येथील प्रसिद्ध फोटोग्राफर भीमाशंकर नावंदे यांचा पुतण्या आहे. या निवडीबद्दल सर्वेश नावंदे याचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.
Add new comment