लाइव न्यूज़
स्वबळावर केज मतदार संघात कोणीच सक्षम नाही
Beed Citizen | Updated: January 27, 2018 - 3:27pm
अंबाजोगाई (प्रतिनिधी) ः कॉंग्रेस, राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना कोणत्याच पक्षाला मानणारा वर्ग मतदार संघात नसुन व्यक्तिनिष्ठेला मतदार संघात प्राधान्य असल्याने पक्ष म्हणून कुणाचीच ताकद नाही. उमेदवारावर युती अथवा आघाडी ठरते. मतदारही त्यालाच प्राधान्य देत असल्याने पक्ष म्हणून मतदार संघात कोणीच सक्षम नाही.
केज (राखीव) मतदार संघाचे पंचेवीस वर्ष स्व.डॉ.विमलताई मुंदडा यांनी प्रतिनिधीत्व केले. त्यांचा प्रतिस्पर्धी भाजपाचा कोणीही उमेदवार राहिला तरी त्याचा पराभवच झालेला आहे. गेल्या निवडणूकीत मुंदडांना राजकारणात मदत करणार्यांनी अंधारात का होईना विद्यमान आमदार प्रा.संगिताताई ठोंबरेंना मदत केल्याने पहिल्यांदा भाजपाला यश आले. पक्ष म्हणून नव्हे तर ठोंबरे व्यक्तीमत्वाला आता राजकारणाची गणिते बदलण्याची शक्यता दिसते. आगामी निवडणूकीला आणखी वर्षभराचा कालावधी असला तरी शिवसेनेने स्वबळाची भाषा केल्याने सर्वच राजकीय पक्षाचे नेते खडबडून जागे झाले आहेत. प्रत्येक मतदार संघात संभाव्य उमेदवाराला सक्रीय होन्याचे संकेत देण्यात आलेत. त्यानुसार सौ.नमिताताई मुंदडा, आ.संगिताताई ठोंबरे, डॉ.अंजली घाडगे या इच्छुक उमेदवार सक्रीय झाल्यात. यापुर्वी शिवसेनेने कळंबच्या नरहिरेताईचा प्रयोग करुन पाहिला. मात्र यश आले नव्हते. यावेळी कोणाला पुढे केले जाते अद्याप निश्चित नसले तरी शिवसेना उमेदवाराच्या शोधात आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा विचार केला तर सर्वात मोठ्या दावेदार नमिता मुंदडा मानल्या जात होत्या. मात्र जिल्ह्याच्या नेत्याशी मुुंदडाचे संबंध दुरावल्याने पक्षापासून सुरक्षित अंतरावर आहेत. अक्षय मुंदडाची आणखी निष्ठा शरद पवार व खा.सुप्रिया सुळेवर असल्याने भाजप प्रवेशाच्या चर्चेला पुर्ण विराम लागला आहे. माजी आमदार साठे यांना उमेदवारी मिळणार असा दावा केला जात असला तरी जिल्हा अध्यक्ष बजरंग सोनवणे व विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे काय भुमिका घेतात यावर बरेच अवलंबुन आहे. भाजपाची तीीच अवस्था आहे. विद्यमान आमदार प्रा.संगिताताई ठोंबरेना गेल्या चार वर्षात सत्ताधारी पक्षाच्या आमदार असूनही स्वतंत्र गट स्थापन करता आलेला नाही. भाजपातील अनेक नेते कार्यकर्ते आपल्या निवडणूकीच्यावेळी आमदारांनी विरोधात प्रचार केला असा आक्षेप आहे. पक्षांतर्गत विरोधकांना ठोंबरे किती आपलेसे करतात यावर बरेच अवलंबुन आहे. कॉंग्रेस पक्ष बीड जिल्ह्यात जिवंत आहे तो फक्त दोन तालुक्यात,दोन नेत्यांनी ठेवला आहे. विशेष म्हणजे दोन्हीही नेत्यांनी पक्षाच्या बॅनरचा वापर स्वतःच्या पुरता करत असल्याने पक्ष वाढत नाही. विधानसभा निवडणूकीसाठी डॉ.अंजली घाडगे इच्छुक असल्या तरी कोणाच्याउमेदवार म्हणून शिक्कामोर्तब होत नाही. तोवर अंदाज वर्तवणे कठीण आहे. शिवसेनेची दोन्हीही तालुकयात कार्यकर्त्यांची फळी आहे. मात्र निवडणूक लढवण्याचा योग आला नसल्याने उमेदवार शोधावा लागेल. कांही इच्छुकांनी संपर्क केल्याचे समजते. बघु या कोणकोण उमेदवार मैदानात उतरतात. त्यावरुन कोण कोणाच्या पाठीशी उभे राहतात स्पष्ट होईल.
Add new comment