बीड येथील मुबल्लिगुल इस्लाम मदरसाचे संस्थापक आणि जम जमचे मालक हजरत मौलाना अब्दुल बाकी यांचे निधन

बीड ( प्रतिनिधी ) येथील मुबल्लिगुल इस्लाम मदरसाचे संस्थापक , बीड दीनियात सेंटरचे प्रमुख आणि प्रसिद्ध अशा जम जम बॉटलिंग इंडस्ट्रीजचे सर्वेसर्वा हजरत मौलाना अब्दुल बाकी सहाब ( वय 50 ) यांचे आज शुक्रवार दि.17 ऑक्टोबर 2025 रोजी निधन झाले. आज दुपारी अचानक हृदयाचा त्रास होऊ लागल्याने त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले मात्र डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले. मौलाना अब्दुल बाकी यांच्या निधनाची वृत्त समजताच अनेकांना धक्का बसला. हजरत मौलाना अब्दुल बाकी यांनी मुबल्लिगुल इस्लाम मदरसाची उभारणी करून समाजातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची दारे खुली केली. खिदमत ए खल्क या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून त्यांनी गेल्या 8 ते 10 वर्षांपासून लाखो गरजूंना विविध स्वरूपाची मदत केलेली आहे. अन्नछत्र चालवून ईद, सण , उत्सव आदीच्या वेळी संसार उपयोगी साहित्य वाटप केले असून आजही हे काम सुरूच आहे. जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना वेळोवेळी मदत केलेली आहे. गरजू, गोरगरीब आणि विधवा महिलांना शिलाई मशीन, मिरची कांडप यंत्र व इतर साहित्य सातत्याने वाटप करण्यात ते नेहमी पुढे असायचे. उर्दू, इंग्रजी आणि धार्मिक शिक्षणाच्या माध्यमातून त्यांनी बीड जिल्ह्यातच नव्हे तर राज्यभर आपली ओळख निर्माण केली होती. दरम्यान हजरत मौलाना अब्दुल बाकी यांच्या निधनाचे प्रत्येकाचा अनेकांना धक्का बसला आहे. मौलाना बाकी यांचे निधन सर्वांच्याच मनाला चटका लावून गेला आहे. मौलाना बाकी सहाब यांच्या निधनाने बीड जिल्ह्यातील शैक्षणिक, धार्मिक आणि सामाजिक क्षेत्राचे मोठी हानी झाली आहे. उद्या शनिवार दि.18 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 10 वाजता तकिया मस्जिद परिसरातील कब्रस्तानमध्ये त्यांचा दफनविधी करण्यात येणार आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन मुली, दोन भाऊ असा परिवार आहे. मौलाना बाकी साहेब यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात सिटीझन परिवार सहभागी आहे.
Add new comment