लाइव न्यूज़
फ्रुट व्यापारी वाहेद बागवान यांचे निधन

फ्रुट व्यापारी वाहेद बागवान यांचे निधन
बीड ( प्रतिनिधी ) शहरातील फ्रुट व्यापारी आणि शाहू नगर भागातील रहिवाशी वाहेद बशीर बागवान ( चौधरी ) यांचे आज सोमवार दि.22 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी निधन झाले. मृत्युसमयी ते 53 वर्षांचे होते. तकिया मस्जिद परिसरातील कब्रस्तानमध्ये आज सोमवारी सायंकाळी 7.30 वा. ( बाद नमाज ए मगरीब) त्यांचा दफनविधी करण्यात येणार आहे. वाहेद बशीर बागवान ( चौधरी ) हे गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र उपचार सुरु असतानाच आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, चार मुली ,भाऊ असा परिवार आहे. सायं. दै.सिटीझनचे उप संपादक नाहेद बागवान यांचे ते बंधू होते. बागवान कुटुंबियांच्या दुःखात सिटीझन परिवार सहभागी आहे.
Add new comment