बीड जिल्ह्यातील शाळांना मंगळवारी सुट्टी जाहीर

बीड जिल्ह्यातील शाळांना मंगळवारी सुट्टी
बीड ( प्रतिनिधी ) बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी जिल्ह्यातील पूर्व परिस्थिती विषयी माहिती दिली आहे. आष्टी तालुक्यातील 52 लोकांना रेस्क्यू ऑपरेशनच्या माध्यमातून सुखरूप पणे सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. जिल्ह्यातील सर्व परिस्थितीवर प्रशासन अतिशय बारकाईने लक्ष ठेवून आहे. जिल्ह्यातील पूरस्थिती आणि पडणारा पाऊस या अनुषंगाने बीड जिल्ह्यातील सर्व शाळांना व महाविद्यायांना उद्या मंगळवार दिनांक 16 सप्टेंबर 2025 रोजी सुट्टी जाहीर करण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. मात्र 17 सप्टेंबर 2025 रोजी मराठवाडा मुक्ती संग्राम दिन असल्याने त्याच्या पूर्वतयारीसाठी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांना सुट्टीतून वगळण्यात आले असल्याचे पत्रात म्हटले आहे.
Add new comment