बीड पोलीस दलातर्फे गणेश विसर्जन मिरवणुकीत कारवाई केलेल्या डीजे (Dolby) वर RTO नी केला लाखोंचा दंड वसूल.

बीड
गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान ध्वनीप्रदूषण टाळण्यासाठी तसेच सर्वोच्च न्यायालय, राष्ट्रीय हरित लवाद व राज्य शासनाचे आदेशानुसार निर्बंधांचे काटेकोर पालन व्हावे यासाठी बीड पोलीस दलाकडून विशेष मोहिम हाती घेण्यात आली होती. या मोहिमेदरम्यान शहरातील विविध ठिकाणी डीजे (DJ Dolby) वाद्यांच्या माध्यमातून प्रचंड आवाजात ध्वनीप्रदूषण करून नियमांचे उल्लंघन केल्याचे निदर्शनास आले.
त्याअनुषंगाने बीड शहरातील पोलीस ठाणे पेठबीड, शिवाजीनगर, बीड शहर या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत गणेश विसर्जनावेळी एकूण 15 DJ वाहने जप्त करण्यात आली आहेत. त्यांच्यावर कारवाई करण्या संबंधी अहवाल उपप्रादेशिक परिवहन विभागाकडे पाठविण्यात आला होता. त्यावरून उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून नमुद वाहनांवर दंडात्मक कारवाई केली असून त्यावरील एकूण दंडाची रक्कम ₹ 5,04,000/- इतकी आहे.
जप्त करण्यात आलेली वाहने व दंडाची रक्कम खालीलप्रमाणे आहे :
1. MH16Q1021 – ₹32,000/-
2. MH04BU4593 – ₹30,000/-
3. MH12D8424 – ₹30,000/-
4. MH10Z437 – ₹32,000/-
5. MH20AT2394 – ₹30,000/-
6. MH33-3076 – ₹48,000/-
7. MH04DK1805 – ₹35,000/-
8. MH50-2678 – ₹39,000/-
9. MH23-5209 – ₹52,000/-
10. MH23AS1650 – ₹44,000/-
11. MH23AS1605 – ₹36,000/-
12. MH38B3496 – ₹25,000/-
13. MH25AD2183 – ₹10,500/-
14. MH16CD8383 – ₹18,000/-
15. MH23AU6359 – ₹10,000/-
एकूण दंडाची रक्कम : ₹ 5,04,000/-
ही कारवाई उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, बीड तसेच पोलीस विभाग यांच्या संयुक्त प्रयत्नातून करण्यात आली असून पुढील काळातही अशाप्रकारे ध्वनीप्रदूषणाविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल. नागरिकांनी कायद्याचे पालन करून उत्सव आनंदात व शांततेत साजरे करावेत, असे आवाहन करण्यात येत आहे.
Add new comment