शिवाजीनगर पोलीसांनी अवैध गुटखाविक्री वर कारवाई करुन मुद्देमाल जप्त केला

बीड (प्रतिनिधी) दिनांक 21/01/2025 रोजी पोलीस स्टेशन शिवाजीनगर, बीड हद्दीत एक इसम हा अवैधरित्या गुटख्याची विक्री करण्यासाठी येत आहे अशी गोपनीय बातमी मीळाल्यावरुन पोलीस निरीक्षक मारोती खेडकर यांनी पोलीस स्टेशन शिवाजीनगर येथील डी. बी. पथकातील पोलीस हवादार /1664 रविंद्र आघाव, पो.शि. 2077 बाळु रहाडे, पो.शि. 983 सुदर्शन सारणीकर, पो.शि. 904 लिंबाजी महानोर यांना कारवाई करण्याबाबत आदेशीत केल्याने डी. बी. पथकातील अंमलदार यांनी नगर नाका येथे मिळालेल्या बातमीच्या सापळा लावुन गुटखा विक्रीसाठी सुझुकी ऑक्सेस गाडी क्र. MH 23 AQ 5715 यावर आलेला आरोपी नामे विशाल रामदार जाधव वय 23 वर्षे, रा. जाधव गल्ली, शाहु नगर, बीड या 19,400/- रुपयाचा गुटख्यासह पकडयात आले. त्याने सदरचा गुटखा हा त्यास जावेद शेख उर्फ बब्बु रा. महाराष्ट्र किराणा दुकान, मोमीनपुरा बीड याचेकडुन विक्री साठी आणल्याचे सांगीतले. यावरुन फिर्यादी नामे बाळु बाजीराव रहाडे वय 32 वर्षे, व्यवसाय-नोकरी पो.शि. 2077 शिवाजीनगर पोलीस स्टेशन, बीड यांचे फिर्यादीवरुन गु.र.नं. 39/2025 बी.एन.एस.एस. कलम 123,223,274, प्रमाणे आरोपी नामे 1) विशाल रामदार जाधव वय 23 वर्षे, रा. जाधव गल्ली, शाहु नगर, बीड (2) जावेद शेख उर्फ बब्बु रा. महाराष्ट्र किराणा दुकान, मोमीनपुरा बीड यांचे विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आलेला सदर गुन्हाचा तपास स.पो.नि. संदीप दुनगहु हे करत आहेत.

सदरची कामगिरी ही मा. पोलीस अधिक्षक श्री. नवनीत कॉवत, अपर पोलीस अधिक्षक श्री. सचिन पांडकर, उपविपोअ विश्वंबर गोल्डे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री. मारोती खेडकर डी.बी. पथकातील पोलीस हवादार /1664 रविंद्र आघाव, पो.शि. 2077 बाळु रहाडे, पो.शि. 983 सुदर्शन सारणीकर, पो.शि. 904 लिंबाजी महानोर यांनी केली आहे.

Add new comment

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.