आ. जितेंद्र आव्हाड यांच्यासह आ. संदीप क्षीरसागर शिवाजी नगर पोलीस ठाण्यात

आ. जितेंद्र आव्हाड यांच्यासह आ. संदीप क्षीरसागर शिवाजी नगर पोलीस ठाण्यात
बीड ( प्रतिनिधी ) बीडमध्ये आजच्या मोर्चाच्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते आ. जितेंद्र आव्हाड आज बीडमध्ये आलेले आहेत. मोर्चा झाल्यानंतर आ. जितेंद्र आव्हाड यांच्यासह आ. संदीप क्षीरसागर व ईतर नेते यांनी दुपारी उशिरा शिवाजीनगर पोलीस ठाण्यात धाव घेतली. दरम्यान बीड मधील मोर्चाच्या अनुषंगाने आल्यानंतर आ. जितेंद्र आव्हाड आणि एका व्यक्तीसोबतचा व्हॉट्सॲपवर चॅटिंग केलेला मजकूर स्क्रीन शॉटसह एका व्यक्तीने सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. त्या चॅटिंगच्या माध्यमातून मोर्चाचे नियोजन व त्या प्रकरणाशी संबंधित काही कथित वाक्य त्यामध्ये दिसून येत आहे. ही पोस्ट मोठ्या प्रमाणावर सोशल मीडियावर व्हायरल झाली असून सदरील चॅटिंग बोगस आणि बनावट असल्याचे स्पष्ट करत आ. जितेंद्र आव्हाड यांनी पोस्ट करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध शिवाजी नगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. यावेळी त्यांच्या सोबत आ. संदीप क्षीरसागर, शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख परमेश्वर सातपुते, राजेसाहेब देशमुख, जावेदभैय्या कुरेशी आदींची उपस्थिती होती.
Add new comment