बीड शहरातील शनिवारच्या मोर्चामुळे वाहतूक मार्गात असेल असा बदल

बीड शहरातील शनिवारच्या मोर्चामुळे
वाहतूक मार्गात असेल असा बदल
बीड ( प्रतिनिधी) बीड शहरात शनिवार दि. 28 डिसेंबर रोजी संतोष देशमुख हत्या प्रकरणी तपासाच्या अनुषंगाने विविध मागण्यांसाठी सर्वपक्षीय, सर्व धर्मीय महा मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. मोर्चाच्या अनुषंगाने वाहतूक कोंडी होऊन नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून बीड शहरांमध्ये येणारी वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्याचे आदेश पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी काढले आहेत.
बीड शहरात सध्या वापरात असलेला
1)नगर नाका, छत्रपती शिवाजी महाराज चौक, बस स्थानक, लायन्स पेट्रोल पंप, महालक्ष्मी चौक या मार्गावरील वाहतूक उद्या दिनांक 28 डिसेंबर रोजी नगर नाका-राजीव गांधी चौक-अंबिका चौक-रिलायन्स पेट्रोल पंप-महालक्ष्मी चौक या पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे.
2)छत्रपती संभाजी महाराज चौक-बार्शी नाका-छत्रपती शिवाजी महाराज चौक-बस स्थानक-महालक्ष्मी चौक या मार्गे जाणारी वाहने छत्रपती संभाजी महाराज चौक-बीड बायपास-महालक्ष्मी चौक या पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे.
3)छत्रपती संभाजी महाराज चौक-बार्शी नाका-छत्रपती शिवाजी महाराज चौक-नगर नाका या मार्गावरील वाहतूक छत्रपती संभाजी महाराज चौक-बीड बायपास-महालक्ष्मी चौक-रिलायन्स पेट्रोल पंप-अंबिका चौक-राजीव गांधी चौक-नगर नाका या पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे.
4) परळी-बार्शी नाका-छत्रपती शिवाजी महाराज चौक- नगर नाका- महालक्ष्मी चौक या मार्गावरील सर्व वाहतूक परळी-बार्शी नाका-बीड बायपास-महालक्ष्मी चौक-रिलायन्स पेट्रोल पंप-अंबिका चौक-राजीव गांधी चौक-नगर नाका या मार्गे वळविण्यात येणार आहे.
वरील मार्गावरील सर्व वाहतूक (मोर्चासाठी जाणारी वाहने, बंदोबस्तातील वाहने, रुग्णवाहिका, अग्निशामक दलाची वाहने वगळून ) दिनांक 28 डिसेंबर रोजी सकाळी आठ ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत सर्व प्रकारची वाहतूक वरील मार्गाने मिळविण्यात येणार आहे. सर्व वाहन चालक-मालक यांनी याची नोंद घ्यावी असे आवाहन पोलीस अधीक्षक नवनीत साहेब यांनी केले आहे.
Add new comment