लाइव न्यूज़
चौसाळा येथील सेवानिवृत्त लाईनमन युनूस पठाण यांचे निधन
चौसाळा येथील सेवानिवृत्त
लाईनमन युनूस पठाण यांचे निधन
बीड दि.19 (प्रतिनिधी) बीड तालुक्यातील चौसाळा येथील सेवानिवृत्त लाईनमन युनुस इस्माईल पठाण यांचे बुधवारी रात्री उशिरा अल्पशा आजाराने निधन झाले. मृत्यूसमयी ते 70 वर्षांचे होते. आज गुरुवार दि.19 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 10 वाजता चौसाळा येथे त्यांचा दफनविधी करण्यात येणार आहे. त्यांच्या पश्चात पत्नी , जावेद पठाण, अजीज पठाण ही दोन मुले, चार मुली , सुना , नातवंडे , जावई असा परिवार आहे. सायं दै. सिटीझनचे कार्यकारी संपादक चंदन पठाण यांचे ते सासरे होते.
Add new comment