गावठी कट्टा व तीन जिवत काडतुसासह एक ताब्यात ;बीडच्या स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी

बीड (प्रतिनिधी)लोकसभा निवडणुकिचा अनुषंगाने मा. विशेष पोलीस महानिरीक्षक छ. संभाजीनगर परिक्षेत्र संभाजीनगर यांनी अवैध अग्निशस्त्र बाळगणारे इसमांविरुध्द कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत. त्याअनुषंगाने मा. पोलीस अधीक्षक बीड यांनी पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा बीड यांना कारवाई करण्याचे आदेश देवून मार्गदर्शन केले आहे.

 

दिनांक 05/03/2024 रोजी पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा बीड यांचे आदेशान्वये अवैध अग्निशस्त्र बाळगणारे इसमांचा शोध घेत असतांना पोउपनि श्रीराम खटावकर स्थागुशा बीड यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, इमस नामे राहुल प्रकाश तुपे रा. शिरापुर ह.मु.बीड हा विनापरवाना बेकायदेशीर रित्या तुळजाई चौक बीड येथे कमरेला

 

गावठी कटटा लावुन उभा आहे. अशी माहितीवरून पोलीस निरिक्षक स्थागुशा बीड यांनी सदर आरोपीचा शोध घेवून कारवाई करण्याचे आदेश दिले. पोउपपि खटावकर यांनी त्यांचे पथकासह तुळजाई चौक बीड येथुन राहुल प्रकाश तुपे वय- 27 वर्ष रा. शिरापुर ह.मु. गोंविद नगर बीड यास ताब्यात घेवून त्याचे ताब्यातील कमरेला लावलेली एक गावठी लोखंडी पिस्टल व 03 जिवंत काडतूस असा एकुण 43,000/- रु चा मुद्देमाल मिळून आल असून ते जप्त करण्यात आलेले आहेत.

 

आरोपी विरुध्द पो. ठा. शिवाजीनगर येथे गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पो.ठा. शिवाजीनगर बीड व स्थानिक गुन्हे शाखा, बीड येथील अधिकारी व अंमलदार करीत आहेत.

 

सदरची कामगिरी नंदकुमार ठाकूर, पोलीस अधीक्षक, बीड,. सचिन पांडकर अपर पोलीस अधीक्षक, बीड यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि.श्री. संतोष साबळे, पोउपनि श्रीराम खटावकर, पोह/मनोज वाघ, प्रसाद कदम, पोना/विकास वाघमारे, सोमनाथ गायकवाड, पोशि/सचिन आंधळे, पोशि/विकी सुरवसे, नारायण कोरडे, चालक/ सुनिल राठोड, स्था. गु.शा. बीड यांनी केली 

Add new comment

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.