पाडळी येथील घरफोडी प्रकरणी एलसीबीने एकास केले जेरबंद
बीडच्या एलसीबीची उल्लेखणीय कामगिरी
बीड (प्रतिनिधी) शिरुर कासार हद्दीतील पाडळी गावातील जालिंदर तुकाराम पाखरे व्यवसाय शेती रा पाडळी ता.शिरुर कासार हे दिनांक 16/02/2024 रोजी सकाळी घराला कुलूप लावून शेतात गेले असता कोणीतरी अज्ञात इसमाने दिवसा 10.30 ते 13.30 त्यांचे घराचा कडीकोयंडा तोडून घरामध्ये प्रवेश करून घरात ठेवलेले सोन्याचे गंठण,लॉकेट,पेंडॉल, अंगठया, झुमके इ. दागिने व रोख असा एकुण 9,21,000/- रु चा मुद्येमाल चोरुन नेला होता.त्यावरुन पो.ठा. शिरुर (कासार) येथे गुरनं 23/2024 कलम 454,380 भादंवि प्रमाणे दिनांक 17/02/2024 रोजी जालिंदर पाखरे यांचे फिर्याद वरुन गुन्हयांची नोंद करण्यात आली होती.
मा.पोलीस अधीक्षक बीड यांनी सदर घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी पोलीस निरीक्षक संतोष साबळे यांना आदेश दिले होते. त्याअनुषंगाने पोलीस निरीक्षक स्था.गु.शा.बीड यांनी सदरचा आव्हानात्मक घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी अशा प्रकारचे गुन्हे करणारे अभिलेखावरील गुन्हेगारांचा शिरुर, अंमळनेर, आष्टी, गेवराई, पाथर्डी (अहमदनगर) भागातील आरोपीचा शोध घेण्यासाठी अधिनस्त अधिकारी व अंमलदार यांना सुचना दिल्या. सदर गुन्हयाचे तपासात पोलीस निरीक्षक श्री. संतोष साबळे स्था.गु.शा.बीड हे गुन्हयाचे विष्लेशन करीत असतांना दिनांक 29/02/2024 रोजी गुप्त बातमी मिळाली की, सदरचा गुन्हा हा राम बाजीराव चव्हाण रा.झोपडपट्टी ता.आष्टी जि.बीड याने मोटार सायकलवर जावून गुन्हा केला केला असल्याची खात्रिशिर माहिती मिळताच पोलीस निरीक्षक स्था.गु.शा.यांनी पोउपनि श्रीराम खटावकर व त्यांचे पथकास आरोपी शोध कामी रवाना केले. पथकाने आरोपीचा शोध घेत असतांना गोपनिय मिळाली की, सदर आरोपी हा पाथर्डी कडुन मोटार सायकलवर शिरुर कडे रोडने जात आहे तेव्हा पथकाने सज्ज होवून आरोपीस मानूर येथुन शिताफीने ताब्यात घेवून त्यास गुन्हयाबाबत विचारपुस केली असता त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. सदर आरोपीस ताब्यात घेवुन पो.ठा.शिरुर यांचे ताब्यात देण्यात आले गुन्हयांतील गेलामालाचा पो.स्टे व स्थागुशा पथका मार्फत समांतर तपास करुन आरोपीचे ताब्यातुन 10 तोळे सोन्याचे दागिने किंमती अंदाजे 6 लाख रु चा मुद्येमाल मिळुन आलेला आहे.
आरोपी राम बाजीराव चव्हाण वय 31 रा.झोपडपट्टी ता.आष्टी जि.बीड ह.मु. चांदगाव ता.पाथर्डी जि.अहमदनगर हा मालाविरुध्दचे गुन्हे करण्याचे सवईचा असुन त्याचेवर अहमदनगर जिल्हयात मालाविरुध्दचे गुन्हयांचे गुन्हे दाखल आहेत.
सदरची कामगिरी ही नंदकुमार ठाकुर पोलीस अधीक्षक बीड,अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक.संतोष साबळे, पोउपनि श्रीराम खटावकर, पोह/मनोज वाघ, प्रसाद कदम, अशोक सोनवणे, पोना/विकास वाघमारे, सोमनाथ गायकवाड, अलिम शेख, नारायण कोरडे, सुशिला हजारे, देविदास जमदाडे, अश्विनकुमार सुरवसे, गणेश हांगे, सचिन आंधळे व चालक/सुनिल राठोड सर्व नेम. स्थानिक गुन्हे शाखा, बीड यांनी केलेली आहे.
Add new comment