अठरा वर्षा पासून कोर्टात हजर न होता पत्ता बदलून पोलिसांना गुंगारा देत असलेला आरोपी LCB ने पकडला

बीड (प्रतिनिधी) पोलीस ठाणे दिंद्रुड हद्दीमध्ये 11 आरोपींनी मिळून सशस्त्र दरोडा घातल्याने त्यांचे विरुद्ध पोलीस ठाणे दिंद्रुड येथे गुरनं.14/2006 कलम-395 भादवी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला जेरबंद केले व तपास करून दोषारोप न्यायालयात सादर केले. त्यानंतर 18 वर्ष लोटूनही त्यामधील 11 आरोपी हे कोर्टात हजर होत नसल्याने माननीय न्यायालयाने त्यांना पकडवारंट काडून त्यांना पकडन्याची कामगीरी LCB ला सोपवली.दि.14/2/2024 रोजी *आरोपी नामे-सतुश ऊर्फ रमेश घनशा भोसले रा.सावरगांव ता.माजलगांव जिल्हा बीड* हा सारखा पत्ता बदलत MIDC सावरगाव तालुका माजलगाव येथे असल्याची खबर गुप्त बातमी दारा मार्फत पोलिसांना मिळाल्याने पोलिसांनी त्यास ताब्यात घेऊन पोलीस ठाणे दिंद्रुड यांचे ताब्यात देण्यात आले असून आरोपीस उद्या कोर्टात हजर करण्यात येणार आहे. सदरची कामगिरी .संतोष साबळे पोलीस निरीक्षक स्थानीक गुन्हे शाखा बीड यांचे मार्गदर्शनाखाली PSI राडकर,Asi तुळशीराम जगताप,पोलीस हवालदार पी.टी.चव्हाण,राहुल शिंदे ,चालक पोकाँ.सुनील राठोड यांनी केली आहे. सदर कामगिरीमुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
Add new comment