वाहन चालकांसाठी डोळ्याचे आरोग्य अत्यंत महत्त्वाचे -डॉ. अशोक बडे.
बीड/ प्रतिनिधी. वाहन चालकांनी शरीराच्या आरोग्यासह डोळ्याच्या आरोग्याची ही काळजी घेतली पाहिजे वाहन चालवताना वाहन चालकांना वेळेवर झोप, जेवण या गोष्टीकडे लक्ष द्यायला वेळ मिळत नाही. किमान डोळ्यांची वेळोवेळी तपासणी करून त्याच्या आरोग्याची काळजी घ्यावी असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक बडे यांनी रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत वाहन चालकांच्या नेत्र तपासणी शिबिरात बोलताना केले.जिल्हा रुग्णालयात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर,तर प्रमुख पाहुणे म्हणुन नेञ विभाग प्रमुख डाॅ.चंद्रकांत वाघ, डॉ.आर आर जाजू ,वाहतुक शाखेचे प्रभारी ए.पी.आय.सुभाष सानप,या शिबिराचे उद्घाटक रोटरी क्लब मिड टाऊनचे अध्यक्ष संजय गुप्ता,सचिव सुरेश बुद्धदेव,कोशाध्यक्ष सर्वदन्य जोशी ,पत्रकार परिषदेचे जिल्हाध्यक्ष विशाल साळुंके, ज्येष्ठ पत्रकार नारायण नागरे,सिटी केबलचे पारस पोरवाल,ट्रक चालक-मालक संघटना अध्यक्ष विजय नाना काकडे,सामाजिक कार्यकर्ते डाॅ.संजय तांदळे ,जिल्हा मोटर डाविंग स्कुलचे अध्यक्ष शहादेव वंजारे ,जिनीयस ऑटो संघटनेचे अध्यक्ष बाबुभाई, सचिव गणेश ढोले आदींची उपस्थिती होती . यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांनी वाहतुकीच्या नियमाबद्दल सविस्तर माहिती दिली .वाहतुकीचे नियम पाळले तर बहुतांश अपघात कमी होतील असे त्यांनी यावेळी सांगितले. आपल्या आरोग्यासोबतच वाहतुकीचे नियमही पाळा असे आवाहन पांडकर यांनी केले. यावेळी डॉ.आर.आर.जाजू यांनी डोळ्याच्या आरोग्याशी असलेला संबंध आणि त्याचा मेंदूशी असलेला संबंध यावर सविस्तर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पोलीस. उप .नि. विजय जाधवर यांनी तर आभार स.पो.उप.नि.वसुदेव मिसाळ यांनी मानले .यावेळी वाहन चालक -मालक संघटनेचे सदस्य,जिनीयस ऑटो संघटनेचे सदस्य, रोटरी क्लबचे सदस्य ,पत्रकार ,कर्मचारी,वाहतुक शाखेचे कर्मचारी , आरोग्य विभागाचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Add new comment