दहा घरफोडी करणारी टोळीकडुन 5 लाखाचे दागिने हस्तगत केले; स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी
बीड (प्रतिनिधी)
दिनांक 08/02/2024 रोजी स्थानिक गुन्हे शाखा, यांनी घरफोडी करणारी टोळी उघडकीस आणुन तीन आरोपी निष्पन्न केले होते त्यापैकी एक आरोपी नामे सचिन ईश्वर भोसले वय 25 वर्षे रा.बेलगाव ता.कर्जत जि.अहमदनगर ह.मु.नागझरी ता.गेवराई यास पो.स्टे.चकलंबा येथे पुढील कार्यवाहीसाठी ताब्यात दिले आहे. सदर आरोपींनी एकुण दहा घरफोडी केल्याचे तपासात निष्पन्न झालेले असून आरोपींनी चोरी केलेला चोरीचा माल कोठे ठेवला याचा शोध घेण्यासाठी पो.स्टे.चकलंबा व स्थागुशा बीड यांनी संयुक्तरित्या शोध घेवून तपास करण्यात आला असून आरोपीने चोरलेली मालमत्ता काढून दिलेली असून एकुण दहा *गुन्हयातील 96 ग्राम सोन्याचे विविध दागिने किंमती 5,10,000/- रु चा सोन्याचा मुद्येमाल जप्त करण्यात आलेला आहे.*
सदरची कामगिरी नंदकुमार ठाकुर, पोलीस अधीक्षक बीड,सचिन पांडकर अपर पोलीस अधीक्षक, बीड, यांचे मार्गदर्शनाखाली स्था.गु.शा पो.नि. संतोष साबळे, पोउपनि श्रीराम खटावकर, पोह/मनोज वाघ, प्रसाद कदम, विकास वाघमारे, सोमनाथ गायकवाड, पोशि सचिन आंधळे, नारायण कोरडे, अश्विनकुमार सुरवसे, महिला पोह/सुशिला हजारे, चालक/ अशोक कदम व राठोड सर्व नेम. स्थानिक गुन्हे शाखा, बीड व पो.स्टे.चकलंबा पोलीस अधिकारी अंमलदार यांनी केलेली आहे.
Add new comment