देशी व विदेशी दारु साठा जप्त ; स्थानिक गुन्हे शाखेची उल्लेखणीय कामगिरी

बीड (प्रतिनिधी) पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी बीड जिल्हयातील अवैधरित्या दारु विक्री करणाऱ्याविरुध्द कडक कारवाई करणेबाबत आदेश दिले होते. त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, बीड यांनी अवैधरित्या दारु विक्री करणाऱ्या इसमांवर कारवाई करण्यासाठी मार्गदर्शन करुन पोलीस उप- निरीक्षक खटावकर यांचे पथकास सुचना दिल्या. त्यावरुन पोलीस स्टेशन अंभोरा हद्दीत दिनांक 09/02/2024 रोजी अवैधरित्या दारु विक्री करणाऱ्या धंदयाची माहिती काढत असतांना गोपनीय माहिती मिळाली की, सावरगांव शिवारातील हॉटेल मध्ये अवैधरित्या दारु विक्री चालु आहे अशी खात्रीलायक बातमी मिळाल्यावरुन मा. पोलीस निरीक्षक संतोष साबळे साहेब यांचे आदेशाने पोलीस उप-निरीक्षक खटावकर व स्टाफ यांनी तात्काळ सावरगांव शिवारात जाऊन अवैधरित्या बेकायदेशिररित्या दारु विक्री करणाऱ्या तीन ठिकाणच्या धाब्यावरील इमस नामे 1) उध्दव महादेव सिरसाट वय 43 वर्ष रा. गंगादेवी ता. आष्टी 2) दौलत बलभिम मस्के वय 30 वर्ष रा. सावरगांव ता. आष्टी 3) अर्जुन भिमा मस्के वय 30 वर्ष रा. सावरगांव ता. आष्टी यांना पकडुन त्यांचे कडुन एकुण 23,920 रुपयाची देशी, विदेशी दारु व बिअर जप्त करुन सदर इसमांवर दारुबंदी कायदया अंतर्गत तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
सदरची कामगिरी ही चेतना तिडके मॅडम प्रभारी पोलीस अधीक्षक, बीड व पोलीस निरीक्षक संतोष साबळे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उप-निरीक्षक श्रीराम खटावकर, पोह/मनोज वाघ, पोह/प्रसाद कदम, पोना/विकास वाघमारे, पोना/1302 सोमनाथ गायकवाड, पोकों/सचिन आंधळे, पोकों/नारायण कोरडे, पोकॉ/42 अशोक कदम सर्व स्थानिक गुन्हे शाखा, बीड यांनी केलेली आहे.
Add new comment