देशी विदेशी दारूचा साठा शहर पोलिसांनी पकडला ; सव्वा लाखाचा मुद्देमाल जप्त

बीड (प्रतिनिधी) आज बीड शहर, पोलीसांना माहिती मिळाली होती की, नावाचा एक इसम हा देशी विदेशी दारूचा मद्यसाठा ग्रामीण भागात किरकोळ विक्री करण्यासाठी घेऊन जाणार आहे, तर पोलीस अधीक्षक श्री नंदकुमार ठाकूर सर आणि अप्पर पोलीस अधीक्षक चेतना तिडके मॅडम, उपविभागीय पोलीस अधिकारी विश्वंभर गोल्डे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शीतलकुमार बल्लाळ, सपोनी बाबासाहेब राठोड, पोलीस अंमलदार बाळासाहेब शिरसाट, जयसिंग वायकर , सुशील पवार, सय्यद मनोज परजणे, यांनी दबा धरून बसून छापा मारला असता एका पांढऱ्या ऍक्टिवा स्कुटीवर दारूचा बॉक्स पोत्या मधे लपून मद्य साठा पकडला. त्यांनी सुरुवातीला भाजीपाला घेऊन जात आहे असे नाटक केले, पोत्याच्या वर भाजीपाला लावलेला होता आणि खाली खोक्यात दारू ठेवली होती. तपासणी केल्या असता त्यामध्ये दारू साठा पोत्यामध्ये सापडला. त्यात मॅकडॉल व्हिस्की मॅकडॉन नंबर वन व्हिस्की रॉयल चॅलेंज आणि देशी दारू अशी दारूचे प्रकार त्याच्या ताब्यात मिळाले एकूण सव्वा लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपी गणेश अश्रुबा येडे, चौसळा, बीड वय 30 वर्ष यास अटक करण्यात आली आहे.
Add new comment