उसाच्या बिलाचे पैसे थकले ; शेतकऱ्याची मोटरसायकलसह गुऱ्हाळाच्या गव्हानीत ऊडी.

उसाच्या बिलाचे पैसे थकले;
 
शेतकऱ्याची मोटरसायकलसह   गुऱ्हाळाच्या गव्हानीत ऊडी.

माजलगावच्या रोशनपुरी येथील रूपमाता गुऱ्हाळातील घटना.

राज गायकवाड-माजलगाव.

उसाच्या बिलाचे थकलेले पैसे वसूल करण्यासाठी एका शेतकऱ्याने आपल्या मोटारसायकलसह गुळाच्या गव्हाणीत उडी घेतली.ही घटना मंगळवार दि.30 रोजी माजलगाव तालुक्यातील रोशन पुरी येथे असणाऱ्या रुपमाता गुऱ्हाळात घडली.

शिंपेटाकळी येथील लक्ष्मण बाबुराव गवळी असे गुराळात उडी घेणाऱ्या शेतकऱ्याचे नाव असल्याची माहिती आहे.यांनी आपल्या शेतातील मोठ्या प्रमाणात ऊस जवळच असलेल्या उस्मानाबाद येथील उद्योजक भाऊसाहेब गुंड यांच्या माजलगाव तालुक्यातील रोशनपुरी येथील रुपमाता गुऱ्हाळात घातला होता. त्यापोठी पैसेही त्यांना मिळाले आहेत.परंतु त्यांच्या 15 टन उसाचे 45 हजार रु सदरील रुपमाता प्रशासन देण्यास टाळाटाळ करत असल्याचे समजते.सारखा तगादा लावला तरी गुऱ्हाळ मालक व स्थानिक प्रशासन ऊस बिलाचे पैसे देत नाही.याचा राग अनावर झाल्याने शेतकरी लक्ष्मण गवळी यांनी आपल्या मोटारसायकलसह गुऱ्हाळाच्या गव्हाणीत मंगळवारी रात्री 10 वाजता उडी घेतली. दरम्यान सदरील शेतकऱ्याची समजूत काढून त्यांना बाहेर काढले.या प्रकाराने साडे तीन तास गुऱ्हाळचे काम बंद पडले.ज्यामुळे अंदाजे 8 लाख रुपये कारखान्याचे नुकसान झाले असल्याची गुऱ्हाळ प्रशासनाची माहिती आहे.याबाबत कारखान्याचे एमडी भाऊसाहेब गुंड यांना या घटनेबद्दल विचारले असता त्यांनी सांगितले की, सदरील घटनेची मला काहीच माहिती नाही.परंतु 20 डिसेंबर पर्यंतचे गुऱ्हाळात ऊस देणाऱ्या शेतकऱ्यांचे पैसे देण्यात आले आहेत.या तारखेनंतरचे पैसेही लवकरच देण्यात येणार आहेत. दरम्यान सदरील घटनेने परिसरात खळबळ उडाली होती.

Add new comment

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.