अनिलदादा जगताप यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश करण्याचा निर्णय

अनिलदादा जगताप यांचा
शिवसेना शिंदे गटात प्रवेश
बीड दि.5 ( प्रतिनिधी ) शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी जिल्हाप्रमुख अनिल दादा जगताप यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतची अधिकृत घोषणा अनिल दादा जगताप यांनी आज दुपारी झालेल्या पत्रकार परिषदेत केली. लवकरच अनिल दादा जगताप आपल्या असंख्य समर्थकांसह शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार आहेत.दरम्यान अनिल दादा जगताप यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे. आजपर्यंत निष्ठेने काम केले. आजही बाळासाहेबांचा सैनिक आणि उद्याही राहील. सातत्याने माझ्यावर अन्याय झाला. तरीही पक्षाचे काम करत राहिलो. यावेळीही पद काढले. विधानसभा निवडणूक जवळ आली की माझे पद काढले जाते हे आतापर्यंतचा अनुभव आहे. जोमाने काम करत असताना पद काढले. माझ्यावर अन्याय का झाला या प्रश्नावर उत्तर मिळाले नाही. सुषमा अंधारे यांनी महाराष्ट्रात अंधार केला आहे. संपर्क प्रमुख पोतदार यांच्यामुळे पक्ष अडचणीत येत आहे. उद्धव साहेबांनी अशा प्रकरणाकडे दुर्लक्ष का केले असा प्रश्न उपस्थित होत असल्याचे त्यांनी सांगितले.
Add new comment