वय झालं म्हणता , तुम्ही माझं काय बघितलं - शरद पवार

वय झालं म्हणता , तुम्ही माझं काय बघितलं - शरद पवार

पीएम मोदींनी देवेंद्र फडणवीसांचा 
सल्ला घ्यावा - शरद पवार

बीड - मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस यांनी मी पुन्हा येईल... मी पुन्हा येईल... असे सांगितले होते. मात्र देवेंद्र पुन्हा आले पण सीएम म्हणून नव्हे तर उपमुख्यमंत्री म्हणून आलेले आहेत. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही काल मी पुन्हा येईल असे सांगितले आहे,  मात्र मोदींनी या संदर्भात देवेंद्र फडणवीस यांचा सल्ला घ्यावा असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी लगावला. माझं वय झालं म्हणता पण तुम्ही माझं काय बघितलं अशा परखड शब्दात शरद पवारांनी राष्ट्रवादीतून बाहेर पडलेल्या बंडखोरांना इशाराही दिला आहे.

बीड येथील माने कॉम्प्लेक्स समोरील मैदानावर आज झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्वाभिमान सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी चौफेर फटकेबाजी करत भारतीय जनता पार्टीसह सत्तेसाठी राष्ट्रवादीतून बाहेर पडलेल्या बंडखोरांनाही सुनावले. केंद्रावर विश्वास ठेवून चालणार नाही.आम्ही स्थिर सरकार देऊ अशी घोषणा ते करतात आणि पुन्हा राज्या - राज्यातील सरकार पाडतात. लोकांनी निवडून दिलेले सरकार भाजप उध्वस्त करत असल्याचा आरोप त्यांनी केला. आता वेळ आलेली आहे, चुकीच्या लोकांना आणि सत्तेचा गैरवापर करणाऱ्यांना रोखण्याची असे स्पष्ट करत मतदारांना मतदान करण्याची संधी मिळाल्यास ते मतदान यंत्रावरील कोणते बटन दाबतील आणि कोणाला कुठे पाठवतील हे नक्कीच समोर येईल. सत्तेच्या बाजूला जायचं तर बिनधास्त जा पण ज्यांच्याकडून आयुष्यात काही घेतलं असेल त्यांच्याविषयी माणुसकी ठेवा नाहीतर जनता तुम्हाला धडा शिकविल असा इशाराही शरद पवार यांनी राष्ट्रवादीतून बाहेर पडलेल्यांना दिला.

संदीप क्षीरसागर यांनी कष्टातून
नियोजन केले - शरद पवार
काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या भाषणात आमदार संदीप क्षीरसागर यांचे कौतुक केले.संदीप क्षीरसागर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मोठ्या कष्टातून या सभेचे नियोजन केले. त्याबद्दल त्यांचे आभार असेही यावेळी शरद पवार यांनी सांगितले.

Add new comment

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.