गुत्तेदाराच्या हलगर्जीपणामुळे चिमुकल्याचा विहरीत पडून मुत्यू

 गुत्तेदाराच्या हलगर्जीपणामुळे  चिमुकल्याचा विहरीत पडून मुत्यू
 ● गेवराई तालुक्यातील राहेरी येथील घटना.●
_____________________तलवाडा  प्रतिनिधी आल्ताफ कुरैशी 
  गेवराई तालुक्यातील राहेरी येथील शेतकरी आनिल फलके हे यांचा मुलगा गेवराई येथील किंग्सन या शाळेत एल केजी च्या वर्गात शिक्षण घेत होता परंतु  त्यांचे  वडील आनिल फलके यांनी त्यांच्या नातेवाईका कडे कार्यक्रम आसल्याने त्यांनी चि. कन्हैयाला सुटी वर राहेरी येथे आपल्या गावाकडे घेऊन आले तसेच दैनंदिन दिनक्रमानुसार नेहमी प्रमामे अनिल फलके स्वाताच्या शेतात गेले आई वडील, आजोबा, आपल्या शेतात काम करत होते त्यांच्या बरोबर चि.कन्हैया देखील शेतात आला होता सर्व कामात मग्न होते चि.कन्हैया देखील खेळत होता दुपारी जेवनाचा वेळ झाल्याने सर्व जन एकत्र आली तेव्हा कन्हैया दिसायला तयार नव्हता त्याच क्षणी आजोबानी शोधा शोध घेतला परंतु काही मेळ लागला नाही आनिल फलके यांनी आपल्या स्वाताची शेतातील जमीन जलजीवनच्या विहिरीचा काम चालु होते हि गांवाला पाणी पिण्यास उपयोगी यावी म्हणून  अनिल फलके दान पत्र करून जमीन दिलेली आहे. हा चिमुकला कन्हैया खेळता खेळता कन्हैया विहिरी कडे कधी  गेला माहित नाही हि घटना दिं.२/८/२०२३ रोजी संध्या काळी पाचच्या दरम्यान विहिरीत सापडला आहे या घटनेची माहिती तलवाडा पोलीस स्टेशनचे सपोनि शंकर वाघमोडे यांनी तात्काऴ  बीट अमलदार सचीन अलगट, पोलीस शिपाई पिसाळ घटनास्थल पोचले पंचनामा करून तलवाडा प्रथामिक आरोग्य केंद्रात शविचेछदन करण्यात आले. सदरील घटना जलजीवन विहरीचे काम करणारे संबधित गुत्तेदार यांच्या निष्काळजीपणा मुळे घडलेली आहे असा सुर गांवकर्यातुन बोलला जात आहे. त्या विहरीचे काम अनेक दिवसांपासून अर्धवट होते. पावसाळ्यापुर्वीच वेळेत विहरीचे काम पुर्ण झाले असते तर हि वेळ आज त्या निष्पाप लेकरावर आलीच नसती. साधं त्या विहरीला कडे जरी टाकले असते तर हि दुर्दैवी वेळ आली नसती. त्या संबधित गुत्तेदारावर  योग्य कायदेशीर गुन्हा दाखल करावा अशी मागणी फलके कुटुंबीयांसह नातलग व गांवकर्याकडून होत आहे या घटनेने राहेरी गांवासह पंचक्रोशीतहळहळ व्यक्त होत आहे.

Add new comment

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.