बीडमध्ये एमपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याची आत्महत्या

बीडमध्ये एमपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याची आत्महत्या 

बीड दि.1 ( प्रतिनिधी ) बीड शहरातील आदर्श गणेश नगर मध्ये एमपीएससीची तयारी करणाऱ्या एका विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज ( सोमवारी ) दुपारी घडली.

बीड शहरातील आदर्श गणेश नगर भागात अक्षय अप्पा पवार ( वय 25 ) या विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची घटना घडली. अक्षय पवार हा मूळचा माजलगाव तालुक्यातील राजेवाडी गावचा रहिवासी आहे. अक्षय हा गेल्या काही वर्षांपासून औरंगाबाद येथे एमपीएससीची तयारी करत होता. रविवारी एमपीएससीची परीक्षा देण्याससाठी तो बीडमध्ये आला होता. त्यामुळे परीक्षा दिल्यानंवर बीड शहरातील आदर्श गणेश नगर मध्ये त्याच्या मित्राच्या खोलीवर तो मुक्कामासाठी थांबला होता. एमपीएससीचा पेपर अवघड गेल्याने त्याने मित्राच्या रूममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे त्याच्या मित्रांनी सांगितले असून अधिकृत कारण मात्र स्पष्ट झाले नाही. या घटनेनंतर शिवाजीनगर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असून मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

Add new comment

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.