जो मै बोलता हु,वही मैं करता हु. पुढचा सभापती शिवसेनेचाच- आप्पासाहेब जाधव

जो मै बोलता हु,वही मैं करता हु.
पुढचा सभापती शिवसेनेचाच-
आप्पासाहेब जाधव.
कोणाला आडवन्या जिरवण्यासाठी नाही तर शेतकऱ्यांच्या हितासाठी आम्ही मैदानात
माजलगाव दि.28 ( प्रतिनिधी ) हजारो ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे पैसे कारखानदारांनी रोखून धरले होते.त्यामुळे शेतकरी रडकुंडी आला होता.त्यावेळी मी त्या शेतकऱ्यांना कारखानदाराकडे अडकलेले पैसे काढून देण्याचा शब्द दिला होता.त्यासाठी मी आंदोलने केली आणि माझा शब्द पूर्ण केला.जो मै बोलता हूं वही मै करता हूं,बाजार समितीत पुढचा सभापती शिवसेनेचाच असा विश्वास शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आप्पासाहेब जाधव यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.यावेळी त्यांनी पत्रकारांना आत्मविश्वासाने सांगितले की,या निवडणुकीत शिवसेना वंचित,संभाजी ब्रिगेड, शेतकरी कामगार पक्ष अशी युती करून आम्ही कोणाचे आढवण्या जिरवण्यासाठी नाही तर शेतकऱ्यांच्या हितासाठी बाजार समिती निवडणुकीच्या मैदानात उतरलो आहोत.
बाजार समिती ही शेतकऱ्यांच्या हितासाठी स्थापन करण्यात आली आहे.परंतु या ठिकाणी ती धन
दांडग्यांनी ताब्यात घेऊन स्वतःचे हित साधून घेत आहेत.बाजार समितीत शेतकऱ्यांना कुठल्याही सुविधा नाहीत.या ठिकाणी नेहमीच शेतकऱ्यांची आढळून करण्यात येते.बाजार समितीत विराजमान असणारे पदाधिकारी व्यापाऱ्यांशी हात मिळवणी करून स्वतःच्या तुंबड्या भरून घेण्यात धन्यता मानत आहेत.असेच लोक पुन्हा निवडणूक मैदानात उतरले आहेत.
परंतु या वेळी लोकांसमोर शिवसेना आणि त्यांच्या मित्र पक्षांचा पर्याय आहे.आम्हाला लोकांमधून प्रतिसाद मिळत आहे.त्यामुळे आमचे आठही उमेदवार या ठिकाणी निवडुण येणार आहेत.आणि या टाकतीवर यंदा बाजर समितीचा सभापती सभापती शिवसेना आणि त्यांच्या मित्र पक्षाचा असणार असल्याचा विश्वासी त्यांनी यावेळी व्यक्त केला.
या पत्रकार परिषदेला शेतकरी कामगार पक्षाचे भाई नारायण गोले,वंचित बहुजन आघाडीचे अंकुश जाधव,तांगडे,संभाजी ब्रिगेडचे पांडुरंग गोंडे यांची उपस्थिती होती.
Add new comment