रमेश आडसकर यांचे कट्टर समर्थक अशोक शेजुळ यांच्यावर अज्ञातकडून जीवघेणा हल्ला
रमेश आडसकर यांचे कट्टर समर्थक अशोक शेजुळ यांच्यावर अज्ञातकडून जीवघेणा हल्ला.
आ.प्रकाश सोळंके विरोधात तक्रार का केलीस म्हणून केला हल्ला.
महिन्याभरापूर्वी सूतगिरणीतील गैरव्यवहारा प्रकरणी केली होती तक्रार.
-----
माजलगाव - येथील भाजपा नेते व रमेश आडसकर यांचे कट्टर समर्थक अशोक शेजुळ यांच्यावर मंगळवार दिनांक 7 रोजी रोजी सकाळी साडेदहाच्या दरम्यान शाहुनगर येथे अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला केला.या जीवघेण्या हल्ल्यात अशोक शेजुळ यांचे दोन्ही हात दोन्ही पाय फ्रॅक्चर झाले असून यावेळी हल्लेखोरांनी अशोक शेजूळ यांना 'तू आमदार प्रकाश सोळंके विरोधात तक्रार का केलीस असे म्हणत मारहाण करण्यास सुरुवात केल्याचा आरोप शेजुळ यांनी केला आहे. दरम्यान महिन्याभरापूर्वी आमदार सोळंके यांच्या विरुद्ध सूतगिरणी प्रकरणात भ्रष्टाचार केल्याची तक्रार अशोक शेजुळ यांनी महिन्याभरापूर्वी केली होती.
माजलगाव येथील भाजपा नेते अशोक तुळशीराम शेजुळ (वय51) यांच्यावर शाहूनगर येथे ते आपल्या स्कुटीवर जात असताना मोटरसायकल वरून पाठीमागून आलेल्या सहा अज्ञात हल्लेखोरांनी राॅडच्या साह्याने त्यांचा हातापायावर जबर मार देऊन दोन्ही पाय दोन्ही हात मोडले आहेत. त्यांच्या डोक्यावर जबर मार लागला असून त्यांच्यावर शहरातील शिवतीर्थ हॉस्पिटल येथे प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी औरंगाबादला हलवण्यात आले आहे.दरम्यान यावेळी अशोक शेजुळ यांनी सायं दैनिक सिटीजनला दिलेल्या मुलाखती सांगितले की,आमदार प्रकाश सोळुंकेची तक्रार का केलीस,तू खूप माजला आहेस का?असे म्हणत मारहाण करण्यास सुरुवात केली असा आरोप शेजुळ यांनी केला. माजलगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शीतलकुमार बल्लाळ यांनी अशोक शेजुळ यांची भेट घेऊन विचारपूस केली असून ज्या ठिकाणी हल्ला झाला आहे त्या ठिकाणी पोलीस जाऊन चौकशी करत आहेत.दरम्यान सदरील प्रकाराने परिसरात दहशतीचे वातावरण पसरले.या घटनेचा सर्वत्र निषेध व्यक्त करण्यात येत आहे.घटनास्थळी भाजप नेते रमेश आडसकर, नितीन नाईकनवरे,अरुण राऊत, दीपक मेंडके,निळकंठ भोसले, अशोक तिडके,यासह माजलगाव तालुका भाजप कार्यकर्ते पोलीस स्टेशन ला जमा झाले आहेत.
Add new comment