मिल्लीया शाळेचे सेवानिवृत्त शिक्षक हाजी शहेंशाह अहेमद यांचे निधन

मिल्लीया शाळेचे सेवानिवृत्त शिक्षक हाजी शहेंशाह अहेमद यांचे निधन
बीड दि.2 ( प्रतिनिधी ) येथील मिल्लीया शाळेचे सेवानिवृत्त शिक्षक हाजी शहेंशाह अहेमद यांचे आज दि.2 मार्च रोजी बडी राज गल्ली बीड येथील राहत्या घरी त्यांचे निधन झाले. मृत्यूसमयी ते 80 वर्षाचे होते. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. आज पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात एक मुलगा , चार मुली , सून , जावई असा मोठा परिवार आहे. आज दि. 2 मार्च रोजी दुपारी 3 वाजता चंदाशाह मस्जिद येथे जनाजा नमाज अदा करून तेथीलच कब्रस्तानमध्ये त्यांचा दफनविधी करण्यात येणार आहे. हाजी शहेंशाह अहेमद हे अत्यंत शिस्तीचे आणि धार्मिक वृत्तीचे होते. गणित विषयाचे उत्कृष्ट शिक्षक म्हणून त्यांनी कारकीर्द गाजवली. अंत्यत मनमिळाऊ स्वभावाचे म्हणून ते सर्वपरिचित होते. हाजी शहेंशाह अहेमद यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सायं. दै. सिटीझन परिवार सहभागी आहे.
Add new comment