खबरदार : बीडमध्ये डीजे वाजवाल तर जेलमध्ये जाल
खबरदार : बीडमध्ये डीजे वाजवाल तर जेलमध्ये जाल
बीडमध्ये लग्नात वाजणाऱ्या डीजेवर कारवाई
बीड दि.24 ( प्रतिनिधी ) पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांच्या आदेशावरून शिवाजीनगर ठाण्याचे पोलीस निरीक्षक केतन राठोड यांच्या टीमने शहरातील रामकृष्ण लॉन्स परिसरात एका लग्नाच्या कार्यक्रमात डीजेवर कारवाई केली आहे. सदरील डीजे सिस्टीम पोलिसांनी ताब्यात घेतली असून उशिरापर्यंत शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. दरम्यान या कारवाईमुळे डीजे चालकांमध्ये आणि तो वाजविण्याचा हट्ट धरणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. यापुढे शहरात डीजे वाजविणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे.डीजे चालकांवरच नव्हे तर डीजे लावणाऱ्या विरुद्ध देखील थेट पोलीस कारवाई करून गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे पोलीस निरीक्षक केतन राठोड यांनी सांगितले.
त्यामुळे यापुढे लग्न सोहळ्यासह इतर कार्यक्रमात डीजे वाजवू नये असे आवाहन शिवाजीनगर पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे. अन्यथा संबंधित डीजे चालक आणि आयोजकांवर कारवाई करण्यात येणार आहे.
Add new comment