अज्ञात वाहनाच्या धडकेत युवकाचा जागीच मृत्यू
अज्ञात वाहनाच्या धडकेत
युवकाचा जागीच मृत्यू
नेकनूर- मांजरसूंबा रोडवरील आठवड्यातील दुसरी घटना
नेकनूर दि.23 ( प्रतिनिधी ) नेकनूर - मांजरसुंबा रोडवरील रत्नागिरी फाट्याजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत २५ वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज शुक्रवारी रात्री ७ वा. सुमारास घडली. गाडीचे चाक डोक्यावरूच गेल्याने ओळख पटणे अवघड झाले होते. मात्र पायातील बूटामुळे ओळख पटवण्यात आली. मयताचे नाव शरद भारत मेंगडे ( वय २५ वर्ष ) रा.सफेपूर ता.बीड असल्याचे सांगण्यात आले. रक्तात भरून गाडीचे चाक रस्त्यावर उमटल्याने चार चाकी कार असल्याचे प्राथमिक अंदाज व्यक्त केले जात आहे. घटनास्थळापासून जवळच होंडाई कारचा साईड ग्लास तुटलेला भाग मिळाल्याने ते वाहन कारच असल्याचे अंदाज नेकनूर पोलिसांनी व्यक्त केला आहे. घटनेची माहिती मिळताच नेकनूर पोलीसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह शवविच्छेदन साठी नेकनूर कुठीर रुग्णालयात पाठवला. दरम्यान या रोडवर अपघाताचे प्रमाण वाढते असून आठवड्यातील हा दुसरा अपघात आहे.
Add new comment