रामपिंपळगाव शिवारात बेपत्ता इसमाचे विखुरलेले कंकाळ सापडले.

कपड्यावरून नातेवाईकाला ओळख पटली.

चार महिन्यांपूर्वी पोलिसात दाखल होती मिसिंग.

माजलगाव प्रतिनिधी दि.13

तालुक्यातील रामपिंपळगाव शिवारात विखुरलेल्या अवस्थेत असलेले मानवी कंकाळ बुधवार दि.14 रोजी सकाळी 9 वाजता सापडले आहे.चार महिन्यांपूर्वी ग्रामीण पोलिसात 63 वर्षीय इसम बेपत्ता असल्याची मिसिंग दाखल करण्यात आली होती.त्या अनुषंगाने कंकाळ लगत असलेल्या कपड्यावरून बेपत्ता इसमाची नातेवाईकाना ओळख पटली आहे.

तालुक्यातील रामपिंपळगाव शिवारात आबासाहेब चाळक यांच्या शेतात ऊस तोडणीचे काम सुरू आहे.यादरम्यान बुधवारी सकाळी 9 वाजता ऊसतोड मजुरांना उसाच्या पाचोटात मानवी कवटी निदर्शनास आली.
घाबरलेल्या मजुरांनी सदरील बाब शेतमालकाला सांगितली.दरम्यान याची खबर पोलिसांना देण्यात आली.तात्काळ या ठिकाणी पोलिसांनी दाखल होत इतर अवयव शोधले.यावेळी वेगवेगळ्या ठिकाणी सदरील शरीराचे अवयव निदर्शनास आले.त्याचबरोबर कपडे आणि चप्पलही सापडली. पोलिसांना 25 ऑगस्ट 2022 रोजी राधाकिसन बाबुराव जगधने वय 63 वर्ष रा.हरकीलिमगाव  येथील बेपत्ता इसमाच्या दाखल मिसिंगसी  साम्य दिसले.त्यामुळे पोलिसांनी बेपत्ता इसमाची मिसिंग दाखल करणाऱ्या नातेवाईकाला बोलावले.सदरील कंकाळलगत असलेल्या कपड्या आणि चप्पलमुळे ही कंकाळ बेपत्ता इसम राधाकिसन बाबुराव जगदाळे यांचे असल्याचे त्यांचा मुलगा तुळशीराम राधाकिसन जगदाळे याने स्पष्ट केले आहे.दरम्यान पुढील वैद्यकीय तपासणीसाठी कंकाळ अंबाजोगाईतील शासकीय इस्पितळात पाठवले आहे.पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश ईधाते,पोलीस शिपाई विलास खराडे करत आहेत.

Add new comment

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.