शाळांना अनुदान घोषित

शाळांना अनुदान घोषित
अघोषितला 20 , वीस टक्के घेणाऱ्या शाळांना 40 तर चाळीस टक्के घेणाऱ्या 60 टक्के अनुदान
बीड ( प्रतिनिधी ) राज्यातील अघोषित शाळा अनुदान आणि टप्पा वाढीवर असलेल्या शाळांना पुढील टप्पा देण्याची घोषणा राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आज दुपारी पत्रकार परिषद केली. अघोषित शाळा 20 टक्के , त्याचबरोबर 20% अनुदान घेत असलेल्या शाळांना 40% आणि सध्या 40% अनुदान घेत असलेल्या शाळांना साठ टक्के अनुदान देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतल्याची माहिती केसरकर यांनी दिली. अघोषित शाळांना 20 टक्के अनुदानासह त्या पुढील टप्प्यावर असलेल्या शाळांना 20 टक्के वाढ देण्यात आली आहे. राज्यातील 60000 शिक्षकांना याचा लाभ मिळणार आहे.यासाठी राज्य सरकारने 1160 कोटी रुपयांची तरतूद करण्याचा निर्णय घेतला असून पुढील आठवड्यात याबाबतचा सविस्तर प्रस्ताव तयार करून जीआर काढणार असल्याचे केसरकर यांनी यावेळी जाहीर केले. स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनी राज्यातील 60 हजार शिक्षकांना न्याय देता आल्याची भावना केसरकर यांनी व्यक्त केली. अनुदानाच्या टप्पा वाढीबाबत शिक्षण मंत्री केसरकर यांनी संबंधित शिक्षकांचे अभिनंदन केले आहे. दरम्यान गेल्या एक महिन्यापासून मुंबईतील आझाद मैदानावर राज्यभरातील शिक्षकांनी आंदोलन सुरू केलेले आहे त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
Add new comment