पतीनेच करायला लावला पत्नीवर अत्याचार

पतीनेच करायला लावला पत्नीवर अत्याचार
पीडित पत्नीच्या फिर्यादीवरून पतीसह त्या नराधमावर गुन्हा दाखल.
माजलगाव प्रतिनिधी दि.3
स्वतःच्या पत्नी सोबत एका व्यक्तीला तिच्या इच्छेला न जुमानता शारीरिक संबंध करायला लावल्याची घटना 26 जुलै 2022 रोजी घडली होती.दरम्यान पीडित पत्नीच्या फिर्यादीवरून 2 नोहे 2022 रोजी ग्रामीण पोलीस ठाण्यात पतीसह त्या नराधम व्यक्तीविरुद्ध अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलीस सूत्रांकडून समजलेली माहिती अशी की,26 जुलै 2022 रोजी माजलगाव तालुक्यातील एका ठिकाणी एका विवाहित महिलेच्या घरात बाशेद इनामदार नावाची व्यक्ती घुसली.व महिलेसोबत शरीर संबंध प्रस्थापित करण्याची मागणी करू लागली.हा सर्व प्रकार महिलेच्या पतीसमोर घडत होता.दरम्यान महिला आरडा ओरड करू लागली. त्यावेळी बाशेद इनामदार यांने आरडा ओरड केलीस तर तुझ्या मुलांना जिवंत मारून टाकेल अशी धमकी दिली.व महिलेवर जबरदस्ती अत्याचार केला.हा प्रकार अनेक दिवस घडत होता.हा प्रकार घडत असतानाच्या दरम्यान विवाहितेचा पती हा घरातून निघून जात असे व बाशेद इनामदार हा पीडित महिलेच्या मनाविरुद्ध तिच्यावर राजरोस अत्याचार करत असे. दरम्यान पीडित महिलेने या अन्यायाला प्रत्यक्ष ग्रामीण पोलीस स्टेशन गाठत 2 नोव्हेंबर 2022 रोजी वाचा फोडली.पीडित महिलेच्या फिर्यादीवरून आरोपी
1)बाशेद इनामदार २) पीडितेच्या पती विरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर ३१६/२२ कलम ३७६/२ (एन)109,506,भादवि नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान प्रकरणातील आरोपी फरार आहेत.
Add new comment