पेठ बीड हद्दीत दोन गटात झालेला वाद वैयक्तिक कारणावरून
*पेठ बीड हद्दीत दोन गटात झालेला वाद वैयक्तिक कारणावरून*
बीड दि.18 ( प्रतिनिधी ) शहरातील पेठ बीड हद्दीत रविवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास दोन गटात वाद झाल्याची घटना मोंढ्यातील चिंचेच्या झाडाजवळच्या परिसरात घडली. सदरील वाद हा वैयक्तिक कारणावरून झालेला आहे. या वादाला कसल्याही प्रकारचे धार्मिक कारण नसल्याचे पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
पेड बीड हद्दीतील मोंढा भागात चिंचेच्या झाडाखाली रविवारी रात्री पवन नावाच्या व्यक्तीचा तेथीलच टपरी चालकासोबत वैयक्तिक कारणावरून वाद झाला. दोन्ही बाजूचे काही तरुण समोरासमोर आल्याने एकमेकांच्या दिशेने किरकोळ दगड मारण्यात आले. या दोघांचे वैयक्तिक कारणावरून गेल्या दोन-तीन दिवसांपासून भांडण सुरू होते, त्यातूनच हा प्रकार घडला आहे. या वादाला कोणतेही धार्मिक कारण नाही. त्यामुळे कोणीही या वादाला तसा रंग देण्याचा प्रयत्न करू नये. अफवा पसरवू नये असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे.
Add new comment