रक्तदान शिबीर मानवताचा संदेश- सर्वच राजकिय सामाजिक संघठणाचा समावेश
बीड ( प्रतिनिधी ) महाराष्ट्र शासनाने आवाहन केले आहे की शासकीय रक्तपेढीत अतिशय कमी रक्तसाठा असल्यामुळे येणाऱ्या काळात मोठ्या प्रमाणात रक्ताचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता आहे . तरी राज्यातील युवकांनी पुढाकार घेऊन जास्तीत जास्त रक्तदान करावे . या अनुषंगाने स्टुडंट्स इस्लामिक ऑर्गनायझेशन ऑफ इंडिया दक्षिण महाराष्ट्र झोन ( एस.आय.ओ. ) तर्फे विविध सामाजिक संघटनांना सोबत घेऊन पूर्ण राज्यामध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे . या निमित्ताने बीड शहरात ब्लड स्टॅक ची नाजूक परिस्थिति पाहून एक भव्य रक्तदान शिबीर,दिनांक १२ एप्रिल २०२१ ,सोमवारी सकाळी ९ ते ५ वाजे पर्यंत तकीया मस्जिद येथे बीड जिल्हा रुग्णालयाच्या सहकार्याने सामाजिक संघटना एस.आय.ओ, अलखैर मल्टीपर्पज फॉउंडेशन,पॉपुलर फ्रंट ऑफ इंडिया बीड,ऑल महाराष्ट्र के.जी. एन ग्रुप,ख़िदमत-ए-ख़ल्क़ वेलफेयर ट्रस्ट,यूनियन ऑफ अत्तार यूथ विंग,मौलाना आझाद बहुउद्देशीय सेवाभावी संस्था,जमीयत उलेमा-ए-हिंद बीड,अल-मदत फॉउंडेशन,तकीया मस्जिद यूथ फोरम, जमात ए इस्लामी हिंद बीड,असे सर्व सामाजिक संघटनांनी एकत्र येउन भव्य रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आली आहे.या शिबिरात बीड शहरातील जास्ती जास्त लोकांनी रक्तदान केले या रक्त्दान शिबिरात विविध सामाजिक संघटनाचे अध्यक्ष आणि सचिव यांनी सहभाग नोंदविला आहे.
Add new comment