सावधान!महिलांच्या गळ्यातील सोने काढून घेणारी टोळी सक्रिय

शहरात महिलामार्फत भुरळ पाडून 6 महिलांना लुबाडण्याची घडली घटना.

जुन्या वस्तू घेऊन नव्या वस्तू देतो म्हणत केल्या जाती ओळख.

पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेण्याची केली टाळाटाळ.

राज गायकवाड-माजलगाव.

 

बाहेर राज्यातून आलेल्या काही महिलांची टोळी माजलगावात स्थानिक महिलांच्या घरोघरी फिरत गळ्यातून सोने काढून घेत असल्याची माहिती आहे.या महिला जुन्या वस्तू घेऊन नव्या वस्तू देतो म्हणत ओळख करतात व त्यानंतर कुठल्यातरी गुंगी आणणाऱ्या पावडरचा वापर करून भुरळ पाडतात.आसीच भुरळ पाडून शहरात पाच ते सहा महिलांना लुबाडण्याची घटना घडली आहे. दरम्यान या घटनेबाबत पोलिसांनी कानावर हात ठेवत गुन्हा दाखल करून घेण्याची टाळाटाळ केली आहे.दरम्यान हजारो रुपयाला लुबाडल्या गेलेल्या महिला मात्र कपाळ बडवत बसल्या असून या घटनेपासून इतरांनी सावध होण्याची गरज आहे.

                        शहरातील आझाद,नगर गौतम,नगर बंजारा नगर या भागात परराज्यातील चारपाच महिला नवीन भांडे फिरून विकत होत्या.दहा दिवसापूर्वी यातील दोन महिला गौतम नगर येथील सविता मंगेश कांबळे यांच्या घरी गेल्या.व त्यांना आम्ही मोठ्या कंपनीकडून आलो आहोत असे म्हणत जुन्या वस्तू वर नव्या वस्तू देतो म्हणून ओळख करून घेतली.यावेळी सविता कांबळे व इतर दोन महिलांनी जुने भांडे त्यांना दिले.लागलीच त्यांना त्यावर नवीन भांडे देण्यात आले.त्यानंतर त्या परराज्यातील महिलांनी सौ.कांबळे यांच्या सोबत असलेल्या महिलेच्या पायातील जोडवे मागितले.कंपनी तुम्हाला या जोडव्याची डिझाईन पाहून नवीन भेटवस्तू देईल असे सांगितले.विश्वास बसलेल्या महिलांनी पायातील जोडवे काढून त्यांना दिले.त्यानंतर मंगळवार दि.6 रोजी 'त्या महिला'सौ.कांबळे यांच्याकडे आल्या व त्यांनी घेतलेल्या जोडव्या बद्दल कंपनीची भेटवस्तू म्हणून नवीन कढई त्यांना दिली.पर राज्यातील महिलांच्या त्या तत्पर सेवेमुळे लाभार्थी महिलांचा त्यांच्यावर पूर्ण विश्वास बसला. यावेळी परराज्यातील त्या महिलेने आपल्या कमरेला खोचलेल्या बटव्यातून कसलीतरी पांढरी पावडर बाहेर काढली.व हातावर हात झटकल्या सारखे केले.व सौ कांबळे यांना त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मणी सहा ग्रॅम चे मंगळसूत्र मागितले.आणि आश्चर्य सौ.कांबळे यांनी लागलीच तात्काळ काढून ते दिले.यावेळी बाजूला असलेल्या सौ.कांबळे यांच्या सासू यांनीही त्यांच्या कानातील तीन ग्रॅम चे सोन्याची फुलं काढून दिली.असाच प्रकार आजाद नगर मध्ये पुनम डोंगरे,रंजना फुलवरे,विमल डोंगरे पंचशिला साळवे,यांच्यासोबतही घडला आहे.या ठिकाणाहून त्या चोरट्या महिलांनी चार ग्रॅमची मनी मंगळसूत्र लंपास केले.तर बंजारा नगर मध्ये अशीच घटना घडल्याची चर्चा आहे.याबाबत लुबाडल्या गेलेल्या महिलांनी बुधवारी पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांना याबाबत विचारले असता पोलिसांनी याबाबत कानावर हात ठेवले असून चोरट्या महिलां विरोधात कुठलाच गुन्हा दाखल केला नाही.दरम्यान गुंगी आणणाऱ्या पावडर मुळे आम्हाला त्या महिलांनी भुरळ घालून आमच्या गळ्यातील सोने काढून देण्यास आम्हाला भाग पडले असल्याची माहिती पीडित महिलांनी दिली आहे.पोलिसांनी त्या महिलांचा शोध घेऊन आमचे दागिने परत मिळवून द्यावेत अशी मागणी पीडित महिला करत आहेत.दरम्यान या घटनेपासून इतर महिलांनी सावध होण्याची गरज आहे.

 

मोबाईल खेळणाऱ्या मुलाकडून त्या चोरट्या महिलेचा फोटो झाला कैद.

 

सौ.कांबळे यांच्या घरी ज्यावेळेस ती परराज्यातील महिला येऊन बसली होती.त्या वेळेस त्या ठिकाणी सौ कांबळे यांचा छोटा मुलगा अँड्रॉइड मोबाईल वरती फोटो काढण्याचा खेळ खेळत होता.त्यावेळेस अनावधानाने ती चोरटी महिलाही त्या फोटोत कैद झाली आहे.

 

Add new comment

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.