बीडमध्ये धक्कादायक घटना ; जिल्हा रुग्णालयाच्या ईमारतीवरून उडी मारून रुग्ण शेतकऱ्याची आत्महत्या

बीड दि.15 ( प्रतिनिधी ) शहरातील नाळवंडी रोडवरील आदित्य कॉलेजच्या इमारतीत  स्थलांतरीत  झालेल्या जिल्हा रुग्णालयात आज पहाटे धक्कादायक घटना घडली आहे. अबोल अशोक भोसले ( वय 31 , रा. सावरगाव ता. भूम ,जि. उस्मानाबाद ) रुग्णाने रुग्णालयाच्या तिसऱ्या मजल्याच्या टेरेसवरून उडी मारून आत्महत्या केली. चार ते पाच तास मृतदेह घटनास्थळी पडून होता अशी माहिती समोर आली आहे. सदरील तरुणाने नापिकीला कंटाळून आत्महत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले.  

 

घोडनदी शिरूर ( पुणे ) येथे अबोल भोसले या तरुणाने गळफास घेवून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. सदरील घटनेत त्याच्या गळ्याला जखम झाल्याने प्राथमिक उपचारानंतर बीड येथील आदित्य कॉलेजमधील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दि. 11 मार्च रोजी दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना काल मध्यरात्री अबोल भोसले याने रुग्णालयाच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या केली. घटनास्थळी पी.आय.पाटील , एएसआय पवार यांनी भेट देऊन पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी मूळ जिल्हा रुग्णालयात पाठवला. सदरील घटनेने खळबळ उडाली असून या प्रकरणी मयताच्या भावाने पेठ बीड पोलिसात जबाब दिल्याचे सूत्रांनी सांगितले.

Attachments area

Add new comment

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.