शाळा उघडणे अजूनही प्रश्नांकित - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
शाळा उघडणे अजूनही प्रश्नांकित - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
बीड दि.22 ( प्रतिनिधी ) राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज रविवारी रात्री 8 वाजता लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. सुरुवातीला त्यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या हुतात्म्यांना वंदन केले. 26 / 11 च्या शूरवीरांना श्रद्धांजली अर्पण केली. नागरिकांनी आतापर्यंत सहकार्य केले त्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेचे आभार मानले. मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, आजपर्यंत सर्व सण अंत्यत संयमाने साजरे केले. कार्तिकीची वारी साधेपणाने गर्दी न करता भक्तीभावाने साजरी करा. माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेत सर्वांनी , यंत्रणेने अफाट काम केले त्याबद्दल त्यांचे आभार. राज्यातील कोरोना काही प्रमाणात नियंत्रणात आणण्यात यश आलेले आहे. मात्र आता परिस्थिती बदलत आहे. काही ठिकाणी कोरोनाची दुसरी ,तिसरी लाट येत आहे. राज्यातील यंत्रणा सक्षम आहे. सगळं काही उघडे आहे म्हणून बेफिकीर राहू नका. कोरोना गेलेला नाही, गर्दी करू नका. अजून लस हाताशी आलेली नाही. मास्क, सोशल डिस्टन्स आणि हात धुणे हा त्यावर उपाय. मास्क न घालता फिरू नका. गर्दी करू नका. शालेय विद्यार्थी आजारी पडले, शिक्षक आजारी पडले तर कसे होणार. योग्य वेळी सर्व गोष्टी उघडी करेल. शाळा उघडायची आहे पण भीती आहे. त्यामुळे शाळा उघडणे अजूनही प्रश्नांकित असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. काही जणांनी सुचविले रात्रीची कर्फ्यु लावा मात्र सगळ्या गोष्टी कायदे करून होत नाही. अजूनही वेळ गेलेली नाही. एका वळणावर आपण उभे आहोत. पुन्हा लॉकडाऊनच्या दिशेने जायचे का ? तर नाही . वॅक्सिंन येईल तेव्हा येईल मात्र तोपर्यंत स्वतः कोरोना पासून लांब राहा. काळजी घ्या.
असे आवाहन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केले.
Add new comment