सोमवारपासून सर्व धर्मियांची प्रार्थनास्थळे उघडणार - मुख्यमंत्री

बीड दि.14 ( प्रतिनिधी ) : दिवाळीच्या मुहूर्तावर राज्य सरकारने राज्यातील जनतेला गिफ्ट दिलं आहे. दिवाळी पाडव्यापासून म्हणजेच 16 नोव्हेंबरपासून राज्यातील सर्वधर्मियांची मंदिरं आणि प्रार्थनस्थळं उघडण्यात येणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ट्वीट करुन याबाबत माहिती दिली. मात्र भाविकांना यावेळी कोरोनाच्या नियमांचं म्हणजेच मास्क वापरणे, सोशल डिस्टन्सिंगच पालन करावं लागणार आहे.
यासंदर्भात नागरिकांना केलेल्या आवाहनात मुख्यमंत्री यांनी म्हटलं की, दिवाळीचे मंगल पर्व सुरू झाले आहे. प्रथेप्रमाणे अभ्यंगस्नान आणि नरकासूर वधही झाला. नरकासुररूपी चिराटी फोडली असली तरी वर्षभर कोरोनारूपी नरकासुराने घातलेला धुमाकूळ विसरता येणार नाही. हा राक्षसही हळूहळू थंड पडत असला तरी बेसावध राहून चालणार नाही. राज्यातील जनतेने या काळात शिस्तीचे पालन केले. त्यामुळेच इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राची स्थिती हाताबाहेर गेली नाही.
Add new comment