नगराध्यक्षपदासाठी शेख मंजूर यांचा मार्ग मोकळा
नगराध्यक्षपदासाठी शेख मंजूर यांचा मार्ग मोकळा.
प्रतिस्पर्धी उमेदवार सौ.मेंडके यांनी घेतली निवडणुकीतून माघार.
राज गायकवाड-माजलगाव.
माजलगाव नगराध्यक्षपदासाठीचा शेख मंजूर यांचा मार्ग प्रतिस्पर्धी उमेदवार सौ रेश्मा दीपक मेंडके यांनी अचानक माघार घेतल्याने मोकळा झाला आहे.भाजपाच्या सौ मेंडके यांनी आपल्या चार सहकाऱ्यांच्या पाठींब्यावर उमेदवारी अर्ज दाखल केला होता.आज नाट्यमय त्यांनी फॉर्म काढून घेतल्याने होऊ घातलेली निवडणूक बिनविरोध होणार असून शेख मंजूर हे नगराध्यक्षपदी विराजमान होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
नगरसेवकातून नगराध्यक्ष निवडणुकीचा कार्यक्रम लागताच प्रकाश सोळंके यांनी यांनी प्रभावीपणे भाजपाच्या ताब्यातील नगरपालिका आपल्या ताब्यात घेण्यासाठी राजकीय पत्ते टाकून शिवसेनेचे 2 भाजपाचा एक व आघाडीचे 3 यांच्यासह तत्कालीन नगराध्यक्ष सहाल चाऊस यांच्या गटाचे तीन उमेदवार आपल्या राष्ट्रवादीच्या तंबूत खेचून आणले होते.व आपले 7 नगरसेवक असे एकूण अठराचे संख्याबळ त्यांनी आपल्या नेतृत्वाखाली जमा केले होते. यावेळी प्रतिस्पर्धी भाजपाकडून सौ रेशमा दीपक मेंडके यांना उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला होता.यावेळी आ. सोळंके यांच्या आदेशाने राष्ट्रवादीकडून शेख मंजूर यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. यावेळी राष्ट्रवादीचा उमेदवार विजयी होणार असा कौल निश्चितपणे दिसून येत होता.परंतु येती निवडणूक बिनविरोध काढण्यासाठी आ.सोळंके यांनी राजकीय डावपेच खेळुन ही निवडणूक बिनविरोध केली आहे. दिनांक 6 रोजी सौ मेंडके यांनी नगराध्यक्ष निवडणुकीच्या मैदानातून नाट्यमय माघार घेतली. त्यामुळे येत्या 9 नोव्हेंबर रोजी होणारी नगर नगरसेवकातून नगराध्यक्षची निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रतिस्पर्धी उमेदवार शेख मंजूर यांचा नगर अध्यक्षपदाचा मार्ग मोकळा करणारी ठरली.
Add new comment