नगराध्यक्ष चाऊस विरुद्ध अविश्वास दाखल करणाऱ्या सर्वपक्षीय 19 नगरसेवकांत फुट

नगराध्यक्ष चाऊस विरुद्ध अविश्वास दाखल करणाऱ्या सर्वपक्षीय 19 नगरसेवकांत फुट.

बहुमताचा आकडा पार करत रा.कॉ.  टीम अज्ञातस्थळी रवाना.

पालिकेतील घडामोडींना  आला वेग.

राज गायकवाड | माजलगाव

नगराध्यक्ष सहाल चाऊस  यांच्याविरुद्ध अविश्वास दाखल करणाऱ्या सर्वपक्षीय 19 नगरसेवकांत फूट पडली आहे. नगराध्यक्ष आपल्याच गटाचा हवा या खेळीत आमदार प्रकाश सोळंके यांनी बाजी मारली असून पालिकेतील बहुमताचा आकडा पार करत समर्थक नगरसेवकांना घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ची टीम रात्रीतून अज्ञातस्थळी रवाना झाली आहे. दरम्यान माजलगाव नगर नगरपरिषदेतील नाट्यमय राजकीय घडामोडींना कमालीचा वेग आला असून भाजप आघाडी समर्थक नगरसेवकांना आपल्या हातून सत्ता जात असल्याची हुरहूर लागून आहे.

नगराध्यक्ष चाऊस यांच्याविरुद्ध अविश्वास दाखल करून सर्वपक्षीय 19 नगरसेवकांनी आ.प्रकाश सोळंके यांच्या हाती पालिकेतील सत्तेची सूत्रे दिली.यावेळी प्रथेनुसार भाजपच्या सौ.मुंडे यांना प्रभारी नगराध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आले. दरम्यान या वेळी विकासाचा दावा करत प्रकाश सोळंके,मोहन जगताप यांनी शहराच्या विकासासाठी आम्ही एकत्रित येत आहोत असे आवाहन केले.अध्यक्ष भाजपचा असला तरी सत्तेची सर्व सूत्र आ.सोळंके यांनी आपल्या हाती एकवटून जवळपास 32 कोटी रुपयांचा निधी सार्वजनिक बांधकाम खात्याकडे वर्ग करण्यात आला. टेंडर प्रक्रिया पालिकेत पार पडत असताना आ.सोळंके यांनी सत्तेतील आपला करिष्मा दाखवत राष्ट्रवादी काँग्रेसच्या हातात पालिकेची सत्ता देण्यासाठी नगराध्यक्ष निवडीची कार्यक्रम  जाहीर केला.आ.सोळंके यांच्या धूर्त राजकारणाने भाजपच्या हातून पालिकेची सत्ता जात असल्याचे  दिसून येत असल्याने  भाजपासह मोहन जगताप आघाडी समर्थक नगरसेवकात चलबिचल निर्माण झाली.गेल्या चार दिवसांतील घडामोडीत आ.सोळंके यांनी आपल्या 7 नगरसेवकांसह इतर सात ते आठ नगरसेवकांना आपल्या तंबूत ओढण्यात यशस्वी झाले आहेत. आज दिवसभरात इच्छुक नगरसेवकांच्या मुलाखती घेण्याचा कार्यक्रम त्यांच्या निवासस्थानी पार पडला. यावेळी इच्छुक उमेदवारांचे नाव गुलदस्त्यात असले तरी शेख मंजूर यांच्या नावाला दुजोरा देण्यात आला असल्याची खात्रीलायक माहिती समोर येत आहे.दरम्यान आज भाजपाच्या सौ रेश्मा दीपक मेंडके यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

Add new comment

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.