भाजपा महिला आघाडीतर्फे नगरपालिकेच्या विरोधात डबके आंदोलन
भाजपा महिला आघाडीतर्फे नगरपालिकेच्या विरोधात डबके आंदोलन
शहराच्या बकाल अवस्थेला नगराध्यक्ष जबाबदार
बीड प्रतिनिधी
लोकनेत्या पंकजाताई गोपीनाथराव मुंडे व खा.प्रीतमताई गोपीनाथराव मुंडे यांच्या नेतृत्वाखाली व भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा उपाध्यक्षा ॲड संगीता धसे यांनी बीड शहरातील प्रभाग क्र.३ मोंढा रोड वृंदावन गार्डन समोर महिला आघाडीच्या वतीने डबके आंदोलन करून बीड नगर पालिका प्रशासनाचे लक्ष वेधले आहे.
बीड नगर पालिकेने बीड शहराकडे पूर्णतः दुर्लक्ष केले आहे.खड्डेमुक्त एकही रस्ता शहरात राहिलेला नाही. सर्वत्र धूळ,घाण,नालीचे पाणी,यामुळे शहराची स्वच्छता दयनीय झाली आहे. अनेक रस्त्यांवर घाण पाण्याचे डबके साचले आहेत सर्वत्र घाण आणि दुर्गंधी यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आहे. कोरोना सारखी जागतिक महामारीशी लढा चालू असताना देखील नगरपालिका स्वच्छतेकडे अक्ष्यम्य दुर्लक्ष करत आहेत. विकासाच्या नावावर करोडो रुपयांचा निधी खर्च करूनही शहरातील रस्त्यांची अवस्था बकाल आहे. जागोजागी डबके साचले आहेत. या बकाल अवस्थेला नगरपालिकेचे अध्यक्ष व नगर पालिका प्रशासन जबाबदार आहे जनतेच्या आरोग्याशी खेळण्याचा हक्क नगरपालिकेला नाही. ज्या जनतेने निवडून दिले त्याच जनतेच्या मुलभूत सुविधांकडे नगरपालिका जाणीवपूर्वक कर्तव्यापासून परावृत्त झाली आहे. नगरपालिकेच्या या भोंगळ आणि बकाल कारभाराकडे लक्ष वेधण्यासाठी महिला आघाडीच्या वतीने वृंदावन गार्डन समोरील रस्त्यावर साचलेल्या डबक्यात महिलांनी बसून डबके आंदोलन केले आहे यावेळी शैलाताई मुसळे,संजीवनी राऊत,गंगुबाई कुडके,सोनाली मुसळे,शोभा मुसळे,लक्ष्मी टिके,सत्यभामा माने,आदी उपस्थित होत्या.
Add new comment