चौघांवरील हल्ला प्रकरणी दोघे गजाआड
चौघांवरील हल्ला प्रकरणी दोघे गजाआड
बीड दि.18 ( प्रतिनिधी ) अंबाजोगाई येथे अंत्यविधीसाठी जाणाऱ्या धारूर येथील तबलीग जमातचे प्रमुख निजामोद्दीन काझी यांच्यासह अन्य तिघांवर प्राणघातक हल्ला करणाऱ्या दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली असून त्यांनी अन्य चार साथीदारांसह गुन्हा केल्याचे निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
दि.16 सप्टेंबर रोजी फिर्यादी निजामुद्दीन खमरोद्दीन काझी ( वय 49 ) रा . कसबा विभाग धारुर हे साथीदारासह डस्टर गाडी क्रमांक एम.एच. - 42 एक्स 4275 ने धारुर येथुन केज मार्गे अंबाजोगाई कडे जात असतांना होळ येथील नदी पुलावर कार बंद पडली म्हणुन कारचे बोनट उघडुन पाहीले तर कुलंट ( पाणी ) संपल्याने त्यांचे सोबतचे सय्यद लईक , सोहेल तांबोळी हे पाणी आणण्यासाठी एका घराकडे गेले व फिर्यादी व साक्षीदार हे गाडीजवळ थांबले असता एक मोटार सायकलवर अज्ञात दोन इसम आले . त्यांच्यात किरकोळ कारणावरुन बाचाबची झाली व शिवीगाळ केली. फिर्यादी व साक्षीदार यांनी शिवीगाळ करु नका असे म्हणताच त्यांनी त्यांचे मोबाईलवरुन फोन करुन इतर चार साथीदारांना बोलावून घेऊन त्यांचे हातातील लाकडी दांडयाने व दगडाने जिवे मारण्याच्या उद्देशाने जखमी सोहेल तांबोळी यास डोकीत तसेच फिर्यादी व साक्षीदार यांना मारहाण करुन गंभीर दुखापत केली आणि डस्टर गाडीवर दगडफेक करुन काचा फोडुन गाडीचे नुकसान केल्या प्रकरणी पो.स्टे . युसुफवडगांव येथे गुन्हा दाखल आहे . सदरचा गुन्हा्ह्हा् व्यक्ध्ल्स्ळी्ळी् पोलीस अधिक्षक , अ.पो.अ. मॅडम अंबाजोगाई , उपविभागीय पोलीस अधिकारी , अंबाजोगाई , पो.नि. स्थानिक गुन्हे शाखा , बीड , स.पो.नि. पो.स्टे . युसुफवडगांव यांनी भेट दिली. पोलीस अधिक्षक हर्ष पोद्दार यांनी गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेऊन गुन्हयातील आरोपी निष्पन्न करुन त्यांना तात्काळ अटक करण्याचे आदेश पो.नि. स्था.गु.शा. व सपोनि यु.वडगांव यांना देऊन आरोपी शोध कामी वेगवेगळे पथके तयार करुन रवाना केली. त्यादरम्यान स्था.गु.शा.चे तसेच पो.स्टे.चे अधीकारी व कर्मचारी यांनी 15 संशयीत लोकांना ताब्यात घेऊन गुन्हयाबाबत विचारपुस केली. पो.नि.स्था.गु.शा.यांनी गोपनीय माहीती काढुन त्यांना मिळालेल्या माहीती वरुन दोन संशयीत इसमांना होळ येथुन ताब्यात घेऊन त्यांना नांव गांव विचारले असता त्यांनी त्यांची नावे1) नारायण धनराज घुगे , 2) राहुल तुकाराम घुगे (दोन्ही रा . होळ ता . केज ) असे सांगितले . त्यांना गुन्हयाबाबत विचारपुस केली असता त्यांनी त्यांचे इतर चार साथीदारसह गुन्हा केल्याचे निष्पन्न झाल्याने , आरोपींना अटक करण्यात आली असुन पुढील तपास सपोनि आनंद झोटे पो.स्टे . यु.वडगांव करीत आहेत.उर्वरीत आरोपींना अटक करणेसाठी स्था.गु.शा. व पो.स्टे.ची पथके रवाना केली आहेत . अशा प्रकारच्या घटनांना आळा घालण्यासाठी गुन्हयातील आरोपींवर कठोर कायदेशीर कारवाई तसेच प्रतिबंधात्मक कार्यवाही करण्याचे प्रस्तावित आहे . सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार , अप्पर पोलीस अधिक्षक श्रीमती स्वाती भोर , उप विभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि.भारत राऊत , सपोनि आनंद झोटे , पो.उप.नि. संतोष जोंधळे , पोउपनि गोविंद एकीलवाले , श्रीमंत उबाळे , गोरख मिसाळ , बालाजी दराडे , कैलास ठोंबरे , प्रसाद कदम , सतिष कातखडे , मनोज वाघ , अशोक दुबाले , राहुल शिंदे , असेफ शेख , सोमनाथ गायवाड , वाहन चालक मुकुंद सूस्कर , राजु वंजारे , अतुल हराळे यांनी केलेली आहे .
Add new comment