बीड जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालये , कार्यालये आणि संस्थांमध्ये ध्वजारोहण करण्याचे आदेश

बीड जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालये , कार्यालये आणि संस्थांमध्ये ध्वजारोहण करण्याचे आदेश 

बीड दि.16 (प्रतिनिधी ) बीड जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने आज आदेश काढून मराठवाडा मुक्ती संग्राम दिन साजरा करण्याचे आदेश दिले आहेत. 

सर्व शासकीय / निमशासकीय कार्यालये , संस्था , आपल्या अधिनिस्त सर्व व्यवस्थापनाच्या , माध्यमाच्या प्राथमिक , माध्यमिक व उच्च माध्यमिक , कनिष्ठ महाविद्यालयामध्ये ध्वजारोहण सभारंभ सकाळी 08.30 पूर्वी किंवा 09.30 च्या नंतर आयोजित करावा , कोरोना विषाणूची पार्श्वभूमी लक्षात घेता मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचा संपूर्ण कार्यक्रम हा समाजिक अंतर संदर्भातील सर्व नियम पाळून तसेच सर्वासाठी मास्क बंधनकारक करुन तसेच केंद्र शासनाच्या गृह मंत्रालय तसेच आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्रालय यांनी वेळोवेळी दिलेल्या सुचनांचे काटेकोरपणे पालन करुन साजरा करावा . संदर्भीय शासन पत्रानुसार व मा.जिल्हाधिकारी , बीड यांनी दिलेल्या सर्व आदेश , सुचनांचे काटेकोरपणे पालन करावे व समारंभाच्या वेळी राष्ट्रीय पोशाख परिधान करावा आशा सूचना देण्यात आल्या आहेत.
■■■ आदेश खालील प्रमाणे ■■ 
 

Add new comment

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.