बीड शहरात नागरिकांना शिथिलता नाहीच, जिवनावश्यक वस्तूही घरपोहच

बीड शहरात नागरिकांना शिथिलता नाहीच,  जिवनावश्यक वस्तूही घरपोहच 

बीड दि. 2 ( सिटीझन ) बीड शहरातील किराणा सामानाची घरपोच सेवा देण्याच्या अनुषंगाने किराणा दुकानांची त्यांच्यासाठी नेमलेल्या प्रभाग/ कॉलनी/गल्ली निहाय यादी ज्यास संबंधित नेमलेल्या दुकानांचे नाव, पत्ता, मोबाईल कमांक दुकानावर नियुक्त कर्मचारी यांचे नाव, मोबाईल क्रमांक निहाय यादी जाहीर करण्यात आली आहे. सदरील घरपोहच किराणा सामानासाठी शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली असून आदेशासोबत संबंधित शिक्षकांची नावे व मोबाईल क्रमांक दिले असून त्यांची कोणत्या दुकांनावर नियुक्ती केली याचीही माहिती यादीत जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी आदेशात दिली आहे. 

नागरिकांनी  अत्यंत आवश्यक किराणा सामान जसे की, तेल, गहू, साखर, तांदूळ इ. वस्तूचीच मागणी त्यांच्यासाठी नेमलेल्या किराणा दुकानदार यांचेकडेच नोंदवावी. नागरिकांनी संबंधित दुकानदार यांच्याकडे अनावश्यक वस्तु (परफयुम, कॉसमेटीक्स .. ची सामानाची मागणी करू नये, संबंधित दुकानावर मागणी नोंदविल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकळी ०९.०० ते दु. १२.०० वा पर्यंत सामानाची घरपोच डिलेव्हरी नियुक्त कर्मचारी यांचे मार्फत करण्यात येईल, अशा सुचना संबंधित कर्मचारी व दुकानदार यांना देण्यात आलेल्या आहेत. नागरिकांनी दुकानदारांशी चर्चा करावी व मागणी नोंदवावी. दुकानदारांकडे Paytm, Googlepay किंवा ऑनलाईन सुविधा असेल तर त्याचा वापर करुनच व्यवहार करावा, अन्यथा कर्मचारी घरी सामान देण्यासाठी आल्यावर त्यांच्याकडे समक्ष रक्कम स्वतः एका पाकीटात भरून दयावी. नागरिकांनी Needly App चा वापर त्यांचे प्रभागातील दुकानदारांशी चर्चा करुन करावा. सदरील अपवर नागरिकांना साहित्याचे दर देखील पाहता येतील.

■■ काय आहे आदेशात ■■■ 

◆ बँकेचे कर्मचारी यांनी त्यांचे केवळ अंतर्गत व महत्वाच्या कार्यालयीन कामकाजासाठीच त्यांचे बँकेचे ओळखपत्र वापरून कामकाज करणेस परवानगी देण्यात येत आहे. कोणत्याही ग्राहकाला त्यांनी प्रत्यक्ष सेवा देऊ नये.

◆  किरकोळ किराणा, घाऊक किराणा व्यापारी व कृषी घाऊक व्यापारी यांनी ऑनलाईन पास काढण्यासाठी अर्जासोबत शॉप अॅक्टची कॉपी/लायसन्स अपलोड करावे व पास प्राप्त झाल्यानंतर दुकान वरील प्रमाणे केवळ घरपोच सेवेसाती चालू करण्यास परवानगी देण्यात येत आहे. कोणत्याही ग्राहकाने या दुकानांवर येण्यासाठी संपूर्ण मनाई आहे.
◆  किरकोळ किराणा व्यापाऱ्यांना सकाळी ८.३० ते दु.१२.३० या व घाऊक किराणा व्यापाऱ्यांना व घाऊक कृषी व्यापाऱ्यांना सकाळी ०९ ते संध्याकाळी ०४.०० वा. पर्यंत परवानगी पासद्वारेच देण्यात येईल. मात्र ती केवळ घरपोहच सेवेसाठीच असेल. 

◆ प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यांनी काढलेल्या आदेशा प्रमाणे जिल्हा न्यायालयातील कार्यालयीन कर्मचारी यांना
परवानगी असेल.

◆ जिल्हा कोषागार कार्यालय यांनी त्यांचे अंतर्गत महत्वाच्या कार्यालयीन कामकाजासाठी त्यांचे कार्यालयाचे ओळखपत्र
वापरून कामकाज करणेस परवानगी देण्यात येत आहे.

◆  अंत्यविधीसाठी शासन पत्रकाप्रमाणे नियमानुसार परवानगी असेल,

◆ पोस्ट ऑफीस राजुरी वेस आणि अधिक्षक  पोस्ट ऑफिस बीड येथील कर्मचारी यांना ओळखपत्र वापरुन कामकाज करण्यास
परवानगी असेल.

◆  सर्व प्रकारची मालवाहतूक त्याअनुषंगाने बीड  शहराच्या हद्दीतील गोदामे चालवण्यास परवानगी देण्यात येत आहे.

 

Add new comment

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.