बीडला धक्का ; आज 5 पॉझिटिव्ह
बीड : धक्का , आज 5 पॉझिटिव्ह
बीड दि.29 ( सिटीझन ) कोविड-19 च्या निश्चित निदानासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय बीड 10, ग्रामीण रुग्णालय आष्टी 09, ग्रामीण रुग्णालय माजलगाव 04, स्वाराती ग्रा. वै. महाविद्यालय आंबाजोगाई 14 याप्रमाणे एकूण 37 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. यासर्व स्वॅबचे अहवाल जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाले असून 37 पैकी 5 रिपोर्ट पॉझिटिव्ह तर 32 निगेटिव्ह आल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. दरम्यान गेल्या सहा दिवसांपासून सर्व रिपोर्ट निगेटिव्ह येत असल्याने दिलासा मिळाला होता मात्र आज 5 पॉझिटिव्ह आल्याने चिंता वाढली आहे.
आज सोमवारी आलेले 5 पॉझिटिव्ह पैकी 2 बीड शहरातील तर अन्य 3 आष्टी तालुक्यातील आहेत.
*कोविड 19-बीड अपडेट - 29/जून/२०२०*
*आज पाठविलेले स्वॅब - 37*
*निगेटिव्ह अहवाल - 32*
*पॉजिटिव्ह अहवाल - 05*
3 - रा.सुर्डी ता. आष्टी - 59 व 31 वर्षे महिला, 32 वर्षे पुरूष (मुंबईहून आलेले)
1 - रा.अजिजपुरा, बीड - ३३ वर्षे पुरूष (औरंगाबादहून आलेला)
1 - दत्तनगर समोरील गल्ली, बीड - 44 वर्षे पुरूष (पॉझिटिव्हशी संपर्क)
Add new comment