बीडमधील विप्रनगरमध्ये कंटेंनमेंट झोन घोषित

बीड दि.27 ( सिटीझन ) शहरातील विप्रनगर, बीड शहर येथे एक रुग्ण पॉझिटीव्ह आढळून आल्याचे डॉ. हेडगेवार हॉस्पिटल, औरंगाबाद यांच्या दुरध्वनी संदेशाद्वारे माहीती प्राप्त झाल्यामुळे, बीड शहरातील विप्रनगर येथील श्रीकिशन जेथलिया यांचे घर ते ज्ञानोबा माऊली मुंडे यांचे घरापर्यंतचा Containment zone जाहीर करणे आवश्यक असल्याचा अहवाल जिल्हा आरोग्य अधिकारी, बीड यांनी संदर्भ ११ अन्यये सादर केला आहे.

बीड जिल्हयात इतर ठिकाणी कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणुन पूढील प्रमाणे फौजदारी प्रकिया दंड संहीता १९७३ चे कलम १४४ नुसार बीड शहरातील श्रीकिशन जेथलिया यांच्या घरापासून ज्ञानोबा माऊली मुंडे यांचे घरापर्यंतचा परिसर Containment zone म्हणून घोषित करण्यात येत असून पुढे अनिश्चित कालावधीसाठी पुर्णवेळ बंद करण्यात येवून संचारबंदी लागू करण्यात येत असल्याचे आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी काढले आहेत

Add new comment

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.