बीड जिल्ह्यात ईदच्या दिवशी दूध विक्रीसाठी परवाना आवश्यक
बीड दि.20 ( सिटीझन ) रमजान ईद निमित्त जिल्ह्यात सर्व ठिकाणी दुधाचा पुरवठा व दुधाची विक्री करण्यासाठी प्रशासनाकडून परवाना देण्यात येणार आहे. त्यासाठी दूध विक्री करणाऱ्यांनी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून तालुका कृषी कार्यालयाकडून परवाना प्राप्त करून घ्यावा असे आवाहन जिल्हा दुग्धव्यवसाय अधिकारी यांनी केले आहे.
बीड जिल्हा प्रशासनाने मी त्यादिवशी दूध विक्री का अनुषंगाने आवाहन केले आहे.पत्रकात म्हटले आहे की, खाजगी किंवा सहकारी दूध पूरवठा करणा-या एजन्सीना सूचीत करण्यात येते की, दिनांक 25 मे 2020 रोजी इद निर्मीत्त बीड जिल्हयात सर्व ठीकाणी दृधाचा पूरवठा/ दूधाची विक्री करण्याकरीता तालूका कृषी अधिकारी कार्यालयाकडे परवानगी मीळणे करीता खालील कागद पत्राची पूर्तता करून इच्छुक दूध विक्रेत्यांनी परवाना प्राप्त करून घ्यावा.
1. दूध विक्रीस इच्छूक असल्यास सहकारी संस्था नांदणी प्रमाणपत्र
2. खाजगी दूध पूरवठा करणाऱ्या एजन्सीचे अन्न व ओषध कार्यालयाचे परवाना प्रमाणपत्र
3. संबधीत पूरवठा करणाऱ्या प्रमुखाचे आधार कार्ड हे कागदपत्रे देवून परवाना प्राप्त करून घ्यावा असे आवाहन जिल्हा दुग्धव्यवसाय अधिकारी बीड यांनी केले आहे.
Add new comment